पुण्यश्लोक अहिल्यादेवी चौक सुशोभिकरणाचा लोकार्पण सोहळा उत्साहात



उस्मानाबाद / प्रतिनिधी- - 

सर्व महापुरुषांनी आपले आयुष्य समाजासाठी खर्ची घालून समाजाला दिशा दाखवण्याचे काम केले. जीवन कसे जगावे, समाजासाठी कसे झटावे याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी आहेत. देशातील शेकडो मंदिराचा जीर्णोद्धार करण्याबरोबर एक स्त्री सुद्धा राज्यकारभार सक्षमपणे चालवू शकते हे त्यांनी दाखवून दिले, त्यामुळे अहिल्यादेवीच्या शौर्याचा महिलांनी आदर्श घ्यावा , असे प्रतिपादन शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केले.

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी जयंतीनिमित्त उस्मानाबाद शहरातील अहिल्यादेवी अहिल्यादेवी चौक सुशोभीकरणाचा लोकार्पण सोहळा आज (दि.31) सकाळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास घाडगे पाटील, माजी नगराध्यक्ष मकरंद उर्फ नंदुभैय्या राजेनिंबाळकर यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ते बोलत होते. आमदार कैलास पाटील यांच्या आमदार निधीतून पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चौकाचे सुशोभीकरण झाले आहे.

पुढे बोलताना खासदार राजेनिंबाळकर म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा भव्य असा पुतळा या चौकात उभारण्यात यावा ही सर्व समाजबांधवांची मागणी आहे. पुतळा उभारणीच्या प्रक्रियेला वेळ लागेल, परंतु या सर्व प्रक्रिया पार पाडण्यासाठी आम्ही सातत्याने समाजाच्या पाठीशी आहोत. अहिल्यादेवी चौकाचे अत्यंत देखणे सुशोभिकरण झालेले असून ते कायम राहावे याकरिता सर्वांनी लक्ष ठेवण्याची गरज आहे. राजकारण हे निवडणुकीपुरते ठेवून समाजाच्या उन्नतीसाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

आमदार कैलास पाटील व माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनीही चौक सुशोभिकरण कामाचे कौतुक केले. कार्यक्रमास मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती समितीचे  मार्गदर्शक प्रकाश जगताप, भारत कोकाटे, जिल्हा बँकेचे माजी संचालक भारत डोलारे,डॉ. संतोष पाटील, ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ वैद्य, माजी नगराध्यक्ष दत्ता बंडगर, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य अ‍ॅड.खंडेराव चौरे, डॉ.संजय सोनटक्के, डॉ.संतोष पाटील, प्रा.बालाजी काकडे, बालाजी वगरे, संतोष डुकरे, दिनेश बंडगर, सुधीर बंडगर, सचिन शेंडगे,   बिभीषण लोकरे, प्रा.सोमनाथ लांडगे,  आकाश नरोटे, नागेश वाघे, समितीचे अध्यक्ष लिंबराज डुकरे, इंद्रजीत देवकते, सुरेश शिंदे, रवी देवकते, प्रसाद तेरकर, सचिन चौरे, समाधान पडुळकर आदीसह समितीचे पदाधिकारी, समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.मनोज डोलारे यांनी केले. तर आभार प्रा.सोमनाथ लांडगे यांनी मांडले.

 
Top