उस्मानाबाद (प्रतिनिधी) -

कर्तव्यावर असताना कोविड संसर्गाने मृत्यूमुखी पडलेल्या नगर परिषदेतील अधिकारी, कर्मचार्‍यांच्या वारसांना शासनाकडून प्राप्त झालेल्या प्रत्येकी 50 लाख रुपये सानुग्रह सहाय्य अनुदान तसेच अनुकंपा धारकांना नियुक्तीचे आदेश आज (दि.9) सायंकाळी वितरित करण्यात आले.

 नगर परिषद कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार  कैलास पाटील माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्या हस्ते  कोविडने मृत्यू पावलेल्या पाच कर्मचार्‍यांच्या वारसांना शासनाकडून प्रत्येकी 50 लक्ष रुपये प्रमाणे प्राप्त झालेले सानुग्रह सहाय्य अनुदान वितरित करण्यात आले.

 मयत कर्मचारी मज्जीद शेख यांचे वारस श्रीमती लैलाबी मज्जीद शेख, जयकुमार मारुती जानराव यांचे वारस श्रीमती रुक्मिणी जयकुमार जानराव, राजेंद्र रामराव पाटील यांचे वारस श्रीमती कमल राजेंद्र पाटील, सुधाकर नवनाथ पांडागळे यांचे वारस श्रीमती वैशाली सुधाकर पांडागळे, अनित चांगदेव तनमोर यांचे वारस श्रीमती प्रभावती अनिल तनमोर यांना सानुग्रह साहाय्य अनुदान वितरित करण्यात आले. तसेच नगर परिषद सेवेत असतांना मृत पावलेल्या 3 कर्मचार्‍यांचे वारस अनुक्रमे विनायक विठ्ठल बिसले (लिपिक) स्वामीनाथ धावारे (लिपिक) तिम्मा गुलगुले (शिपाई) या पदावर अनुकंपाच्या लाभाद्वारे नगर परिषदेच्या सेवेत सामावून घेण्यात आल्याचे आदेश मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. या कार्यक्रमास धनजंय शिंगाडे, सोमनाथ गुरव, बाबा मुजावर, सिध्दार्थ बनसोडे, गणेश खोचरे, श्री.कुरेशी यांच्यासह नगर परिषद अधिकारी, कर्मचारी व शहरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

 यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार  कैलास पाटील माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले. तसेच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री  अजित पवार, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात व महाराष्ट्र शासनाचे कोविड-19 मुळे मृत पावलेल्या कर्मचार्‍यांच्या वारसांना शासन आदेशाद्वारे सानुग्रह सहाय्य अनुदान मंजूर करुन वितरित केल्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाचे आयोजन व सुत्रसंचालन मुख्याधिकारी तथा प्रशासक हरिकल्याण येलगट्टे यांनी केले.


 
Top