उस्मानाबाद (प्रतिनिधी) -

उस्मानाबाद जिल्ह्यातील तलावांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी निती आयोग,भारतीय जैन संघटना आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने प्रचार मोहिमेचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांच्या उपस्थितीमध्ये आज (दि.09) प्रचार वाहनास हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला.

 उस्मानाबाद जिल्ह्यामधील लघुसिंचन साठवण तलाव,पाझर तलाव यामधील गाळ बाहेर काढून या तलावांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी निती आयोगाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. जिल्हाधिकारी- जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून उस्मानाबाद जिल्ह्यातील जास्तीत जास्त गावांनी आपल्या हद्दीतील तलावांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी  बैठकीमध्ये बोलताना व्यक्त केले.

 जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये या मोहिमेच्या प्रचाराकरिता दोन गाड्या प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तलावांचे पुनरुज्जीवन करण्याकरिता जिल्हा परिषद समन्वयक म्हणून यामुळे मध्ये सहभागी झालेली आहे. गाळमुक्त तलाव आणि गाळयुक्त शेती हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ही मोहीम जिल्ह्याभरात राबवली जात आहे. जास्तीत जास्त ग्रामपंचायतींनी आपल्या गावाची निवड होण्याकरिता ठरावाचा अर्ज भारतीय जैन संघटना कडे जमा करावा असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ यांनी यावेळी केले. या बैठकीला भारतीय जैन संघटनेचे पुणे (वाघोली) येथील मुख्य व्यवस्थापक अशोक पवार,जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक अभिजीत मैदाड,जिल्हा समन्वयक दत्तात्रय पवार,भुजंग पाटील यांची उपस्थिती होती.

 जिल्हा परिषदेच्या प्रांगणामध्ये श्रीफळ वाढवून या वाहनांना प्रचार  करिता हिरवा झेंडा दाखवण्यात आला. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ, पाणी व स्वच्छता मिशन चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार, भांडार विभाग प्रमुख मधुकर कांबळे यांच्यासह सर्व तालुक्यातील गटविकास अधिकारी यावेळी उपस्थित होते.

 
Top