उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 तेरला समृद्ध इतिहास लाभला आहे. तेरचे नाव व येथील इतिहास केवळ जगाच्या नकाशावर आणून थांबायचे नाही, तर येथील विचारांची समृद्धी सर्वांच्या सहकार्याने जगभर पोहोचविण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन आ. राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी सोमवारी तेर येथे केले.

 बौद्ध पौर्णिमेनिमित्त तेर (ता. उस्मानाबाद) येथील २५०० वर्षांचा इतिहास लाभलेल्या बौद्ध स्तूप (चैत्यगृह) येथे पहिल्यांदाच कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीला अभिवादन करून सामुदायिक बुद्ध वंदना घेण्यात आली. 

 यानंतर उपस्थितांना संबोधीत करताना आ. राणा जगजितसिंह पाटील म्हणाले, येथे आल्यानंतर एक वेगळी सकारात्मक ऊर्जा मिळते. या ऊर्जेचा उपयोग चांगल्या कामासाठी होणे आवश्यक आहे. महापुरुषांचे विचार आपण सर्वजण वाचतो - ऐकतो, मात्र कृतीत काही उतरवत नाही. सातवाहनकालीन या वास्तूंचे केवळ जतनच नाही, तर संवर्धन करणे गरजेचे आहे. ही वास्तु राज्य संरक्षित स्मारक असून ती विकसित करण्यासाठी पाच-सहा सदस्यांची समिती तयार करून वास्तुविशारद मार्फत आराखडा व अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी प्रमुखांना केल्या. या वास्तूच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नसल्याचा विश्वास त्यांनी दिला. चांगला बोध देणाऱ्या देशभरातील विद्वानांना निमंत्रित करून पुढील वर्षीचा कार्यक्रम भव्य दिव्य करण्याचा संकल्पही यावेळी त्यांनी बोलून दाखवला.

 केंद्रीय पर्यटन मंत्री ना. जी किशनजी रेड्डी यांनी राष्ट्रीय स्मारकासाठी भरीव निधी देण्याचा शब्द दिला असून, आगामी अधिवेशनात याबाबतचे निकष देखील शिथिल करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे केंद्र सरकार कडून निधीची कमतरता भासणार नाही. येथील काही वास्तू राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी यावेळी सांगितले.

 तेर चे नाव जगाच्या नकाशावर केवळ पोहोचवायचे नसून येथील आर्थिक समृद्धीसह विचारांची समृद्धी सर्वांच्या सहकार्याने जगभरात पोहोचवायची आहे, यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित असून कृतीमधून अनेक गोष्टी करून दाखवण्याचा संकल्प आमदार राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

 यावेळी सुदेश माळाळे, रविंद्र शिंदे, गुणवंत सोनवणे, भाऊसाहेब आदुरकर, कानिफनाथ देवकुळे, रमाकांत गायकवाड, सोमनाथ गायकवाड, विकास बनसोडे, के. टी. गायकवाड, सरपंच नवनाथ नाईकवाडी उपसंपच रविराज चौगुले, पद्माकर फंड, जुनेद मोमीन, विठ्ठल लामतुरे, भास्कर माळी, ,भिवाजी वाघमारे, भागवत गायकवाड, केशव वाघमारे, चंद्रकांत सोनवणे, विठ्ठल धावारे, सतिश जाधव,आदी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुमेध वाघमारे, शशिकांत सोनवणे, समाधान सरवदे,  अभिजीत सावंत, संदीप गाल्टे, निखील खंदारे, ऋषीकेश कांबळे, शुभम वैराग्य, चंद्रकांत डोलारे, शुभम कांबळे, सचिन धावारे, विशाल सोनवणे, आदीनी परिश्रम घेतले.


 
Top