उमरगा  / प्रतिनिधी-

जगात भारताची ओळख भगवान बुद्धाचा देश म्हणून केली जाते जगभरातील ज्या ज्या देशांनी बुद्धाचा धम्म स्वीकारला त्याची उतुंग प्रगती झाली आहे.  जगाला सन्मार्गावर आणण्याची ताकद बुद्ध विचारात असून आपण सर्वानी त्याची शिकवण आत्मसात करून सुखी समाधानी व्हावे असे मत तहसीलदार राहुल पाटील यांनी व्यक्त केलें.

तालुक्यातील कराळी येथील दि लॉर्ड बुद्धा रिलिजिएस अँड चॅरिटेबल ट्रस्ट च्या बुद्ध विहारा समोर भंतें सुमंगल यांच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या अशोकस्तंभाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम सोमवारी  तहसीलदार राहुल पाटील यांच्या हस्ते बुद्ध पौर्णिमेच्या निमित्याने करण्यात आला.या वेळी भंतें सुमंगल, प्रदेश काँग्रेसचें सचिव दिलीप भालेराव, ट्रस्टचें उपाध्यक्ष मतसेंद्र सरपे, जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष कैलास शिंदे, समाज कल्याणचे माजी सभापती हरीश डावरे, एस. के. चेले. माजी नगराध्यक्षा शालिनी सरपे, ललिता सरपे, आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी पंचशील ध्वजाचे पूजन सह.पो. नि.महेश क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले. तर तहसीलदार राहुल पाटील यांनी कुंदळ मारून अशोक स्तंभाचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी पोलीस निरीक्षक मनोज राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात श्री पाटील बोलत होते. पुढे बोलताना तें म्हणाले की बुद्ध पौर्णिमेचा उत्सवं जगभर मोठया उत्साहात साजरा होतोय मात्र आपल्यकडं असलेल्या नियमाची पायमल्ली होऊ नये म्हणून येथे ही जयंती साजरी केली जात आहे. मी आजारी असून सुद्धा आपल्या मैत्री मुळे आणि बुद्ध गुणांच्या ओढी मुळे या कार्यक्रमात आलो असल्याचे तें म्हणाले. या वेळी ट्रस्ट चें उपाध्यक्ष एम. एस. सरपे, कैलास शिंदे, दिलीप भालेराव आदींची भाषणे झाली. भंतें सुमंगल यांनी बुद्ध पौर्णिमेच्या दिनाचे महत्व विषद करीत उपासकाना धम्म उपदेश केला.

या कार्यक्रमास संविधान विचारमंचचें अध्यक्ष अशोक बनसोडे, अभियंता संजय सरपे, प्रा सूर्यकांत वाघमारे, डी. टी. कांबळे, संतोष सुरवसे,राहुल सरपे, मिलींद कांबळे, डी. एम. कांबळे, आदींनी परिश्रम घेतले दाबका येथील बौद्ध उपाशिका शांताबाई मारुती कांबळे यांच्या वतीने उपासकांनां भोजन दान देण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  डॉ.प्रा. आप्पाराव गायकवाड यांनी केलें


 
Top