उस्मानाबाद / प्रतिनिधी-

रायगडावर ६ जून रोजी दरवर्षी प्रमाणे िशवराज्याभिषेक सोहळा साजरा होत असतो. या सोहळ्यात देशातून ५ ते ६ लाख शिवभक्त येत असतात. उस्मानाबाद येथील शिवराज्याभिषेक सोहळा  समिती गेल्या २० वर्षांपासून या सोहळ्यास जात असते. यावर्षी जिल्हयातून २५०० ते ३००० हजार मावळे जात असले तरी शिवराज्याभिषेक सोहळ्यानंतर  परिसराची स्वच्छता करण्यासाठी ८०० मावळ्यांचे  पथक खास काम करणार आहे, अशी माहिती शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे अध्यक्ष शशिकांत खुने यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

शनिवार दि.२८ मे  रोजी झालेल्या पत्रकार परिषदेस अॅड.प्रशांत जगदाळे, रवी मुंडे, कंचेश्वर डोंगरे, दत्तात्रय साळुंखे,गौरव बागल, गुंडोपंत जोशी आदी उपस्थित होते. अधिक माहिती देताना शशिकांत खूने म्हणाले की, शिवराज्याभिषेक सोहळा उत्सव साजरा करण्याची प्रथा उस्मानाबादकरांनी २० वर्षापुर्वी चालू केली. त्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी मोठ्या प्रमाणात सोहळा साजरा करण्यास सुरुवात केली. ६ जूनला धार तलवारीची, युध्दकला महाराष्ट्राची, जागर शिवशाहीरांचा, स्वराज्याचा इतिहास, सोहळा पालखीचा आदी कार्यक्रम शिवराज्यभिषेक सोहळ्यािनमित्त रायगडावर होणार असल्याचे दत्तात्रय साळुंखे यांनी सांगितले. 

 
Top