काटी/ प्रतिनिधी-

 तुळजापूर तालुक्यातील काटी येथील प्रगतिशील शेतकरी अन्वर काझी यांच्या पत्नी तथा येथील हिन्दुस्तान मेडिकल ॲन्ड जनरल स्टोअर्सचे चालक गुलजार काझी यांच्या मातोश्री नजमाबेगम अन्वर काझी वय (73) यांचे आज शुक्रवार दि. 27 रोजी उपचारासाठी सोलापूरला जात असताना दुपारी तीन वाजता उत्तर सोलापूर तालुक्यातील गुळवंची गावानजीक जीप ड्रायव्हरचा  जीपवरील ताबा सुटल्याने जीपचा अपघात झाला. जीप पलटी होऊन झालेल्या अपघातामुळे त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. तर ड्रायव्हर शहाबुद्दीन शेख गंभीर जखमी झाला आहे. त्याचा पाय व हात फ्रक्चर झाला असून सोलापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ड्रायव्हरची प्रकृती स्थिर असल्याचे माहिती मिळाली आहे.

 नजमाबेगम काझी यांच्या अपघाती निधनामुळे काझी कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी  संध्याकाळी उशिरा दफनविधी करण्यात आला‌.

       त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, दोन विवाहित मुली, जावई , नातवंडे असा परिवार आहे.

 
Top