उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शासकीय रुग्णालयात दरवर्षी प्रमाणे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था रुग्ण कल्याण समितीच्या वतीने पाणी दानाच्या उपक्रमातुन करण्यात येते.या उपक्रमात अनेक जण सहभागी होऊन पाणी दानासाठी समोर येतात,कोणी वाढदिवस, स्मृतीदिन,सामाजिक बांधिलकी, महामानवांच्या जयंत्या अशा विविध दिनाच्या निमित्ताने पाणी दान करतात,हा उपक्रम गेल्या अकरा वर्षांपासुन भर उन्हाळ्यात रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी राबविला जातो,पाणी दात्यांना पाणी दान केल्यामुळे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येते,यावर्षी आमदार कैलास दादा पाटील यांनी त्यांच्या आमदार निधीतून पाण्याची सोय केल्याबद्दल पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे, यामुळे रुग्ण कल्याण समितीच्या वतीने राबविण्यात येणारा पिण्याच्या पाण्याचा उपक्रम या वर्षी स्थगित करण्यात आला आहे.

 परिस्थिती व गरजेनुसार उपक्रम चालु करण्यात येईल असे उपक्रमाबाबत सामाजिक कार्यकर्ते गणेश रानबा वाघमारे यांनी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ सचीन देशमुख सर यांच्याशी चर्चा करतांना म्ह्टले,वैद्यकीय अधिकारी डॉ सचीन देशमुख सर यांनी पाण्यासहित इतर बाबींवर चर्चा केली, रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी पाण्याचा वापर काटकसरीने व व्यवस्थित करावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.आमदार कैलास पाटील यांचे आभार मानत नगर परिषद व शासकीय रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ सचीन देशमुख सर यांचेही त्यांनी आभार मानले.चर्चा करतांना सामाजिक कार्यकर्ते गणेश रानबा वाघमारे,  पांडुरंग मते,रमेश गंगावणे व इतर उपस्थित होते.या पाणी दान उपक्रमात सहभागी असलेले रुग्ण कल्याण समिती सदस्य अब्दुल लतिफ साहेब, सामाजिक कार्यकर्ते गणेश रानबा वाघमारे,सचिन चौधरी,संजय गजधने,सलीम शेख,विशाल घरबुडवे,आयुब पठाण तसेच शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी कर्मचारी अन्य इतर सामाजिक राजकीय क्षेत्रातील महिला भगिनी व बांधव.

 
Top