उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 उस्मानाबाद तालुक्यातील वडगाव सी येथील अंकुश काका मोरे युवा प्रतिष्ठाण व सिद्धेश्वर स्पोर्ट्स क्लब वडगाव सी यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त वडगाव सी येथे वडगावचे युवानेते अंकुश काका मोरे व पंचायत समितीचे सदस्य गजेंद्र जाधव यांच्या संकल्पनेतून  महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्वात उंच 125 फूट उंचीच्या भगवा ध्वजाचे ध्वजारोहण खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर,आमदार कैलास दादा पाटील,माजी नगराध्यक्ष नंदू   राजेनिंबाळकर यांच्या हस्ते झाले.

  या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून माजी नगरसेवक सोमनाथ गुरव,रवी वाघमारे,बाळासाहेब काकडे,प्रवीण कोकाटे आदींची उपस्थिती होती उद्या दि. 14 मे रोजी वडगाव येथील छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व १५ मे रोजी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेची गावातून भव्य शोभायात्रा व मिरवणूक काढण्यात येणार आहे. 

जयंती उत्सवाच्या यशस्वितेसाठी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे,उपाध्यक्ष सुरज वाडकर,प्रकाश मोरे, सरपंच बळिराम कांबळे,उपसरपंच जयराम मोरे,सुदर्शन मोरे,सदस्य धीरजकुमार मोरे,पोपट मोरे,चंद्रकांत मोरे,विश्वजीत गुरव,अण्णा पांढरे,सुनील पांढरे,रणजीत मोरे,प्रमोद चादरे,अभिजीत मोरे,महेश मोरे,अंकुश काका मोरे युवा प्रतिष्ठान,सिद्धेश्वर स्पोर्ट्स क्लब,संभाजी महाराज जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी आदी परिश्रम घेत आहेत.


 
Top