उस्मानाबाद / प्रतिनिधी-

भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पिकविमा मिळविण्याबाबत मुख्यमंत्र्यासोबत बैठक घेऊन त्रिकुटाने आपली लायकी सिध्द करावी, असे आव्हान केले होते. या आव्हानाला युवासेनेचे विभागीय सचिव अक्षय ढोबळे यांनी प्रतिउत्तर देताना लोकसभा निवडणुकीत १ लाख २८ हजारची लीड होती तर उपसरपंच असणारा सामान्य घरातील झेडपीचे तिकीट नाकारल्यामुळे आमदार करणारा  खासदार ओमराजे निंबाळकर हेच नेते आहेत. त्यातुनच त्यांनी आपली लायक असल्याचे सिध्दच केले आहे, असे म्हणत भाजपवर टिकास्त्र सोडले आहे. 

पुढे बोलताना ढोंबळे म्हणाले की,  माझा नेता ….माझी ताकद लोकप्रिय,  खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर हेच असून लोकसभा निवडणुकीतील  १ लाख २८ हजार ची लिड होती हे तुम्हाला विसरुन  चालनार नाही आणि लायकीच बोलायच म्हणाल तर  ♦️उपसरपंच असनारे  एक सामान्य घरातील व्यक्तिस तुम्ही झेडपीच तिकिट नाकारल त्यांच व्यक्तीला आमच्या लायकी असणाऱ्या नेत्याने आमदार केले आहे. हे कस िवसरू शकता. त्याचप्रमाणे नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उम्मेदवारी नाकारणाऱ्या मकरंदराजे निंबाळकर यांना नगराध्यक्ष केले. माझ्या सारख्या सामान्य घरातील व्यक्तीला कुठलाही राजकीय वारसा नसलेल्या व्यक्तीला युवासेना विभागीय सचिव म्हणुन काम करण्याची संधी दिली, असे कार्य फक्त लायक नेतृत्वच करू शकते, असा टोला अक्षय ढोबळे यांनी लगावला आहे. 

 
Top