तुळजापूर  / प्रतिनिधी-

 महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६२ वा वर्धापन दिनानिमीत्त रविवारदि१ रोजी  तहसील कार्यालयामध्ये ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर तुळजापूर तालुक्यातील कदमवाडी येथील   सहा वारकरी वारीला जात असताना अपघातात  मरण पावले होते त्यांच्या वारसांना प्रत्येकी दोन  लाख रुपये मदतीचा धनादेश तहसिलदार   सौदागर तांदळे , यांच्या हस्ते सपुर्द करण्यात आला.

   राष्ट्रीय कुटूंब लाभ योजनेअंतर्गत एकूण १३ लाभार्थ्यांना प्रत्येकी वीस हजार रुपये धनादेशाचे वितरण करण्यात आले . तसेच निवडणूक विभागांतर्गत प्राथमिक स्वरुपात ०५ मतदारांना स्मार्ट मतदार फोटो ओळखपत्राचे वाटप  करण्यात आले . पुरवठा विभागतर्गत जागतिक ग्राहक दिनानिमीत्त घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेमधील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व चषकाचे वितरण करण्यात आले . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री . संदीप जाधव , पुरवठा निरीक्षक श्री . अमित भारती , नायब तहसीलदार श्री . एम . के . पाटील , नायब तहसीलदार , संगायो यांनी केले.

 विजेत्यास्पर्धकांना प्रमाणपञ वाटप 

 ग्राहक दिनानिमित्त जागो ग्राहक जागो या विषयावर चित्रकला स्पर्धेत  प्रथम क्रमांक सई जगताप, द्वितीय क्रमांक वैष्णवी धनवडे,तृतीय क्रमांक रिद्धी पाटील या मुलींनी

 मिळविला याबद्दल आज  रविवार दिनांक १ मे महाराष्ट्र दिन या दिवसाचे औचित्य साधून  तहसीलदार श्री. सौदागर तांदळे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. या स्पर्धा घेण्यासाठी कला अध्यापक श्री आय.बी. अमंगी,  श्री एस. जी. भोरगे ,श्री. सी .एस. गोमारे, श्री एच.जी. जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.    विद्यालयाचे प्राचार्य श्री गंगाराम सिंह व उपप्राचार्य एस .व्ही.स्वामी यांनी या विद्यार्थ्यांचेही अभिनंदन  केले.

 
Top