उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 राज्य सरकारने पेट्रोल डिझेल स्वस्त केल्याची घोषणा केली होती ती बोगस असल्याचा आरोप भारतीय जनता युवा मोर्चा ने केला आहे.भाजपा युवा मोर्चा च्या वतीने राज्य सरकारद्वारे आकारण्यात येणाऱ्या इंधनावरील कर कमी करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले 

  राज्य सरकारद्वारे आकारण्यात येणारा इंधनावरील कर हा त्वरित कमी करण्यात यावा जेणेकरून महागाईला “आळा बसेल आणि जनतेला दिलासा मिळेल. जर का हे पाऊल येणाऱ्या ३ दिवसांमध्ये म्हणजेच ७२ तासांमध्ये उचलले नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणावर आक्रामक आंदोलन करण्यात येईल आणि मग ज्या गोष्टी घडतील त्याला संपूर्णपणे महाविकास आघाडी जबाबदार असेल असा इशारा िनवेदनाद्वारे देण्यात आला आहे. 

या निवेदनावर जिल्हाध्यक्ष राजसिंहा निंबाळकर,अमोल नाईकवाडी,सागर दंडनाईक, ओंकार देवकते, हिम्मत भोसले,सुजित साळूंके, ज्ञानेश्वर पडवळ,धनराज नवले, अँड फूलदिपसिंग भोसले आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 
Top