तुळजापूर / प्रतिनिधी-

 अखिल भारतीय गोंधळी समाज संघटना राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन दिनांक 29 मे 2022 रोजी कर्नाटकातील बंगलोर येथे करण्यात आले आहे . अशी माहिती अखिल भारतीय गोंधळी समाज संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष  राजेंद्र विठ्ठलराव गायकवाड ( गोंधळी ) यांनी  दिली.

 या अधिवेशनात महाराष्ट्र , तेलंगणा , गुजरात , मध्यप्रदेश ,  , छत्तीसगढ़ , गोवा , दिल्ली , तामिळनाडू या दहा राज्यामधील देशभरातून एक हजार प्रतिनिर्धीना निमंत्रित करण्यात आले आहे . यावेळी प्रथम निमंत्रित प्रतिनिधीची नाव नोंदणी महात्मा गांधी भवन , बेंगलूर सिटी येथे करण्यात येईल आणि त्यांच्या राहण्याची सोय आहे तेथे सांगीतले जाईल . अधिक माहितीसाठी या अधिवेशनाचे निमंत्रण डॉ . सिद्राम डी . वाघमारे , निमंत्रक राजेंद्र ( आण्णा ) वनारसे , व्यवस्थापकीय सह सचिव सुरेशराव काळे यांच्या कडे संपर्क साधावा अशी माहिती पत्रकात दिली . रेल्वे , बस किंवा खाजगी वाहनांसाठी कोणत्याही प्रकारची अर्थिक मदत कोणासही दिली जाणार नाही . आपली फक्त अधिवेशनात निवास , भोजन आणि पास ची सोय करण्यात आली आहे . अशी माहिती अखिल भारतीय गोंधळी समाज संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा . श्री . राजेंद्र विठ्ठलराव गायकवाड ( गोंधळी ) यांनी दिली आहे .. संपर्क : मा . श्री . राजेंद्र ( आण्णा ) वनारसे राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री . डॉ . सिद्राम डी . वाघमारे ( कर्नाटक प्रदेशाध्यक्ष ) :मा . सुरेशराव काळे ( राष्ट्रीय सह सचिव ) यांनी दिली

 
Top