उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 कळंब  तालुक्यातील ईटकूर येथील आश्विनी अविनाश गंभीरे हिच्या शिक्षणासाठी आ. कैलास पाटील यांनी दिड लाख रुपयांची मदत केली आहे. आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने व आश्विनीचा नंबर शाहू कॉलेज लातूर येथे लागल्याने वडील अविनाश राजाराम गंभीरे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यावेळी आ. कैलास पाटील यांनी प्रत्यक्षात भेट घेऊन सांत्वन केले आश्विनी हिची शैक्षणिक जवाबदारी घेतली होती.

आ. कैलास पाटील यांचे बंधू आतिष पाटील, शिवसेना तालुका प्रमुख शिवाजी कापसे यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन आश्विनी हिला दिड लाख रूपये रोख स्वरूपात दिले. यावेळी तालुका उपाध्यक्ष भारत सांगळे, शहराध्यक्ष प्रदिप मेटे, पं. स. माजी उपसभापती लक्ष्मण आडसुळ, ईटकुर ग्रा. पं. उपसरपंच विलास गाडे, ग्रा. पं. सदस्य आबासाहेब आडसुळ, गुंडेराव गंभीरे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष विजय माने, बाळासाहेब गंभीरे, धनंजय गंभीरे, श्रीमंत आडसुळ, चंद्रकांत आडसुळ, दादा गंभीरे उपस्थित होते.

 
Top