उस्मानाबाद / प्रतिनिधी-

कलाअविष्कार अकादमी उस्मानाबादच्या वतीने देण्यात येणारे उस्मानाबाद शहरातील साहित्यक कै .श.मा. पाटील राज्य स्तरीय साहित्य पुरस्कार २०२२  व कै. त्र्यंबक दादा शेळके राज्य स्तरीय सेवा पुरस्कार २०२२ वितरण सोहळा यशवंतराव चव्हाण जि.प. सभागृहात दिमाखदार सोहळा संपन्न झाला .

 प्रथम मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन व स्वागताने कार्यक्रमाची सुरूवात होऊ न तुळजापूरचे आमदार राणा जगजीतसिंह पाटील शुभहस्ते कार्यक्रमाचे अध्यक्ष कलाविष्कार अकादमी अध्यक्ष युवराज नळे , जेष्ठ साहित्यिक लातूर योगिराज माने , प्रमुख उपस्थिती एस.पी.शुगर्स चेअरमन सुरेश पाटील, उद्योजक अशोक शेळके कलाविष्कार अकादमी उपाध्यक्ष विधिज्ञ राज कुलकर्णी कलाविष्कार अकादमी सचिव शेषनाथ वाघ कै .श.मा. पाटील यांच्या पत्नी , कलाविष्कार अकादमी मार्गदर्शक राजेंद्र अत्रे या मान्यवरांच्या हस्ते गझलकार प्रा.डॉ. अविनाश सांगोलेकर यांना कै.श.मा. पाटील राज्य स्तरीय साहित्य पुरस्कार २०२२ व कै.त्र्यंबक दादा शेळके राज्य स्तरीय सेवा पुरस्कार २०२२ शिवराज्याभिषेक सोहळा समितीस रोख रक्कम, सन्मानपत्र, सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भागवत घेवारे, रवींद्र शिंदे , सुदेश माळाळे, राजाभाऊ कारंडे, अविनाश मुंडे , अर्थव कुलकर्णी, गणेश मगर, दिपक तुळजापूरे यांनी परिश्रम घेतले. या पुरस्कार सोहळ्यासाठी परिसरातील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कलाविष्कार अकादमी कोषाध्यक्ष हणमंत पडवळ यांनी केले तर डॉ. अरविंद हंगरगेकर यांनी आभार  मानले.


 
Top