उस्मानाबाद /प्रतिनिधी

रविवार दि.29 मे  रोजी खा. सुप्रियाताई सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा केंद्र उस्मानाबादच्या दृष्टी संवाद- यशवंतराव चव्हाण सेंटरचे व्हिजन डॉक्युमेंट सादरीकरण विशेष संवाद बैठकीचे यशवंतराव चव्हाण सभागृह, जिल्हा परिषद, उस्मानाबाद येथे दुपारी  12.30 वा.आयोजन केले आहे. या बैठकीत खा. सुप्रियाताई सुळे, कार्याध्यक्ष यशवंतराव चव्हाण सेंटरच्या पुढील वाटचाली संदर्भात विचार मांडतील.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उस्मानाबाद जिल्हा केंद्राचे अध्यक्ष जीवनराव गोरे उपस्थित राहणार आहेत. तत्पुर्वी सकाळी 11 वा. श्रीमती मुण्मयी कोळपे व श्रीमती हेमा पिंगळे यांचे व्याख्यान होणार आहे. तरी यशस्विनी सामाजिक अभियानाच्या महिलांनी उपस्थित रहावे, असे आवाहन यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई जिल्हा केंद्र उस्मानाबादच्या वतीने करण्यात आले आहे.


 
Top