उस्मानाबाद /प्रतिनिधी

 शिराढोण येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी सायंकाळी पाच लाख २६ हजार ८७० रुपयांचा गुटखा पकडला आहे.

गुप्त खबऱ्यामार्फत माहितीनुसार पथकाने छापा टाकला असता जमीर जिलाणी तांबोळी (३२) घरासमोर ॲपेमधून महाराष्ट्र शासन प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ असा एकुण पाच लाख २६ हजार ८७० रुपयांचा माल बाळगलेला आढळून आला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ, सहाय्यक पोलिस निरीक्षक निलंगेकर, हवालदार जानराव, काझी, निंबाळकर, काझी, चौरे, पठाण, काकडे, कवडे, जाधवर, टेळे, सोनवणे, पठाण यांच्या पथकाने ही कारवाई केली. हवालदार विनोद जानराव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 
Top