उस्मानाबाद / प्रतिनिधी -

नुकत्याच जाहीर झालेल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या निकालानुसार येत्या १५ दिवसात विमा कंपनीने सर्व शेतकऱ्यांना विमा वाटप करण्याबाबत राज्य स्तरावरून आपले पत्र देऊन निर्देशित करावे,अशी विनंती बुधवारी मंत्रालयात राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्याकडे खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा अामदार कैलास पाटील यांनी भेटून केली. या विनंतीनंतर मंत्रीमहोदयांनी तात्काळ कृषी आयुक्त धीरजकुमार यांना विमा कंपनीशी पत्रव्यवहार करून येत्या १५ दिवसांत विमा मिळायचा बाकी असलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर विम्याची रक्कम जमा करण्याबाबत सूचना दिल्या. मंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेमध्ये एकही शेतकरी विम्यापासून वंचित राहणार नाही, याची सर्व जबाबदारी माझी आहे, असा विश्वास त्यांनी दिल्याचे खासदार अाेमराजे यांनी सांगितले.

 
Top