उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शिवसेना संपर्क अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ८ जून रोजी औरंगाबादेत भव्य सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला उस्मानाबाद जिल्ह्यातील शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास घाडगे-पाटील यांनी केले आहे.

उस्मानाबाद येथे सुनील प्लाझा येथे शिवसेना संपर्क कार्यालय सुरू करण्यात आले असून कार्यालयाचा उद्घाटन सोहळा शुक्रवारी (दि.२७) आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी ते बोलत होते. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी संपर्क कार्यालयामुळे शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक व सामान्य नागरिकांच्या अडचणी सोडवण्यास मदत होईल, अशा आशावाद आमदार कैलास पाटील यांनी व्यक्त केला. याप्रसंगी शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख अनिल खोचरे, माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, तालुकाप्रमुख सतीश सोमाणी, माजी नगराध्यक्ष दत्ता बंडगर, प्रदीप साळुंके, माजी शहरप्रमुख प्रवीण कोकाटे, पंचायत समितीचे माजी उपसभापती श्याम जाधव, दिलीप जावळे, सौदागर जगताप, संजय खडके, हणमंत देवकते, दिनेश हेड्डा, दीपक पाटील, धनंजय इंगळे, विनोद पवार, शिवाजी सरडे, दादा कोळगे, राजनारायण कोळगे, अण्णा पवार, धनंजय वीर, आबा सरडे, राज जाधव, मुकेश पाटील, राजेंद्र तुपे, अनंत भक्ते आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

शिवसेना तालुकाप्रमुख सतीशकुमार सोमाणींचा सत्कार

शिवसेना संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख सतीशकुमार सोमाणी यांचा वाढदिवसानिमित्त आमदार कैलास पाटील, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख अनिल खोचरे, माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, माजी शहरप्रमुख प्रवीण कोकाटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top