परंडा / प्रतिनिधी :-

परंडा तालुक्यातील सरणवाडी या गावचा रहिवाशी, कल्याणसागर माध्यमिक विद्यालय डोमगाव ता. परंडा विद्यालयातील सेवक सुरेश जाधव यांचा सुपुत्र कृष्णा जाधव याची इंडोनेशियन क्रिकेट संघात निवड झाली आहे. या निवडी बद्दल कृष्णा सुरेश जाधव याचा कल्याणसागर समुहाच्या वतीने आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते संवाद  निवासस्थानी सत्कार करण्यात आला.शाल, फेटा, श्रीफळ, पुष्पहार, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 

  यावेळी कल्याणसागर समुहाचे मार्गदर्शक विकास कुलकर्णी, परंडा नगर परिषदचे गटनेते सुबोधसिंह ठाकूर, सरस्वती प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत पवार, कल्याणसागर माध्यमिक विद्यालय, परंडा चे मुख्याध्यापक किरण गरड, अंगद लांडगे अन्य उपस्थित होते.


 
Top