परंडा प्रतिनिधी : -

 ग्रामीण भागांमधून रा गे शिंदे महाविद्यालय हे उत्कृष्ट महाविद्यालय म्हणून उस्मानाबाद जिल्ह्यातून या महाविद्यालयाने  ओळख निर्माण केली आहे.असे प्रतिपादन माधवराव पाटील महाविद्यालय मुरूम या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ  सपाटे ए.के. यांनी व्यक्त केले . रा.गे .शिंदे महाविद्यालयांमध्ये माधवराव पाटील महाविद्यालयाच्या सर्व वरिष्ठ विभागाची टीम नॅक  मार्गदर्शनासाठी महाविद्यालयात आलि होती तेव्हा त्यांनी या महाविद्यालयाचे सर्व कामकाज  पाहिले . नॅकचा अ दर्जा प्राप्त झाल्याने प्रत्येक विभागाने तयार केलेल्या आपल्या विभागाच्या फाइल्स तपासून प्रत्येक विभागाकडून मार्गदर्शन घेतले . महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ दीपा सावळे यांच्या अध्यक्षतेखाली आलेल्या मान्यवरांचा  सत्कार  करण्यात आला. सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा डॉ शहाजी चंदनशिवे यांनी सत्कार समारंभाचे आयोजन केले होते. प्राचार्या डॉ.दीपा सावळे यांनी  सांगितल्याप्रमाणे  या महाविद्यालयाचे आयक्यूएसी चेअरमन डॉ महेशकुमार माने यांनी सकाळी अकरा वाजल्यापासून सायंकाळी सात वाजेपर्यंत नॅक  संदर्भात मार्गदर्शन केले.याच बरोबर  सात क्रायटेरियाचे समन्वयक  प्रा जगन्नाथ माळी , डॉ विद्याधर नलवडे , प्रा डॉ महेशकुमार माने , प्रा डॉ अक्षय घुमरे  ,प्रा डॉ संतोष काळे , प्रा डॉ प्रशांत गायकवाड आणि प्रा डॉ आर के देशमुख इत्यादींनी आपापल्या विभागाच्या तयार केलेच्या  फाईल संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले .

      या वेळी माधवराव पाटील महाविद्यालयातील आई क्यू ए सी चे चेअरमन डॉ के एच रजपुत , प्रा धुळेकर , प्रा रजपुत पी डी ,डॉ महेश मोठे , डॉ सूर्यवंशी एस एल , डॉ बजगिरे,डॉ खडके  व्ही .व्ही ,डॉ गणापुरे आर डी , डॉ जाधव बी एच , डॉ पंचलेगल्ले  एस व्ही ,डॉ देवशेटे आर् एम , प्रा पवार एल एम आणि या महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी डॉ शीला स्वामी इत्यादी उपस्थित होते .

       प्राचार्या डॉ दीपा सावळे यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत करत या महाविद्यालय मधून जे काही कामकाज चालते ,जे काही कार्यक्रम होतात आणि या महाविद्यालयातील प्राध्यापकांनी केलेल्या कामाचा वृत्तान्त सविस्तरपणे आलेल्या सर्व मान्यवरांना माहिती दिली .

 
Top