उस्मानाबाद / प्रतिनिधी-

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित २९वे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन २८ व २९ मे दोन दिवसीय संमेलन जालना जिल्ह्यातील मंठा येथे संपन्न झाले. उद्घाटक राजेश टोपे संमेलन अध्यक्ष श्रीपाद सबनीस राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे कवी यांच्या उपस्थितीत संमेलनाची सुरुवात झाली.

 या संमेलनात कवि नवोदित कवि अथर्व कुलकर्णी , सत्यहरी वाघ , गणेश मगर , युसुफ सय्यद उस्मानाबादच्या साहित्य क्षेत्रातील पुढच्या पिढीतील युवा व आश्वासक कवींनी दमदार सादरीकरण केल्यानं तर कवी संमेलन अध्यक्ष किशोर टिळेकर , मान्यवर सीताराम नरके,प्रा.नितीन नाळे, गजानन दराडे , युवराज नळे यांचे हस्ते सहभागी कवींचे स्मृती चिन्ह , प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. संमेलनासाठी कलाध्यापक शेषनाथ वाघ, राजाभाऊ बिराजदार होते . देश राज्य भरातून बहुसंख्येने साहित्यिक उपस्थित होते .

 
Top