उस्मानाबाद / प्रतिनिधी-

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा खा.शरदचंद्र पवार ह्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उस्मानाबाद जिल्हा ओबीसी सेल कार्याध्यक्ष पदाची नियुक्ती पत्र संसदरत्न खा. सुप्रिया ताई सुळे  यांच्या उपस्थितीत उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा कार्याध्यक्ष ओबीसि सेल या पदाचे नियुक्ती पत्र अँड विशाल साखरे यांना देण्यात आले.  

यावेळी मा. शिक्षक आमदार  विक्रम काळे , आ. राहुल   मोटे, प्रदेश सरचिटणीस सुरेश पाटील ,  जिल्हाध्यक्ष सुरेशदाजी बिराजदार ,जिल्हाध्यक्ष ओबीसी सेल बाळासाहेब स्वामी तसेच जीवनराव गोरे  मा. संजयजी निंबाळकर  विधानसभा अध्यक्ष अमित भैया शिंदे ,मा. नितीनजी बागल ,शहराध्यक्ष अयाज शेख नगरसेवक खलिफा कुरेशी,  नगरसेवक गणेशबाप्पा खोचरे,  नगरसेवक पृथ्वीराज चिलवनते ,अमोल सुरवसे , बाबा मुजावर व इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते  . सदर कार्याध्यक्ष पदाच्या माध्यमातून जनमानसात आत्मविश्वास वाढविण्यासाठी तसेच संकल्प सिद्धीसाठी निर्धारपूर्वक प्रयत्न करण्याची, जनमानसात पक्षाची ताकद वाढविण्यासाठी पक्षाला जनमानसांत शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी, पक्ष बळकटीकरणासाठी व मजबूत करण्यासाठी प्रामाणिकपणाने कोणतीही अपेक्षा न ठेवता अविरतपणे कार्य करीत राहीन तसेच पक्षाने जो माझ्याबद्दल  आजपर्यंत च्या राजकीय कारकिर्दीवर विश्वास दाखवीत एक मोठी नवी जबाबदारी दिली त्याला नक्कीच प्रामाणिकपणाने न्याय देण्यासाठी अविरतपणे कार्य करीत राहीन

 
Top