उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 उस्मानाबाद शहरातील महात्मा बसवेश्वर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या वतीने आज बसवेश्वर चौकात पुर्णाकृती पुतळ्याचे पुजन आमदार कैलास दादा घाडगे पाटील,नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर,जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अँड प्रविण शेटे,कार्याध्यक्ष रवि कोरे आळणीकर,नगरसेवक सोमनाथ गुरव,अक्षय ढोबळे,रवि वाघमारे,शिवसेना शहरप्रमुख पप्पु मुंडे,उमाकांत आग्रे,किरण शेट्टे,अजय शेट्टे,बापु माळी,कोषाध्यक्ष सोमनाथ बेलुरे,पंकज पाटील,यांच्या प्रमुख उपस्थितीत महाआरती करण्यात आली.यानंतर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते आमदार कैलास दादा पाटील यांच्या आमदार निधितुन महात्मा बसवेश्वराच्या चौकाच्या  शुशोभिकरणाच्या कोनशिलेचा अनावरण कार्यक्रम संपन्न झाला.

तसेच शुशोभीकरणाचे काम उत्तम प्रतिचे केल्याबद्दल आमदार कैलास दादा पाटील यांनी इंजिनियर राहुल गवळी यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.शासकीय महिला रूग्नालय उस्मानाबाद येथे अक्षय तृतीयाच्या मुहुर्तावर जन्मलेल्या बालकास बेबी कीटचे वाटप आमदार कैलास दादा घाडगे पाटील,महिला रूग्नालयाच्या अधिक्षता डॉ सौ गवळी,आरोग्य अधिकारी शिवकुमार हलकुंटे,डॉ लामतुरे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.या कार्यक्रमास अँड विशाल साखरे,नितिन शेरखाने, महेश उपासे,सुरेश गवळी,श्रीकांत साखरे,ऋषीकेष चपणे,सुनिल शेरखाने,समाधान भोरे,शिवानंद कथले,राजाभाऊ माळी,राम माने,अँड यावलकर,दादासाहेब घोडके,जितेंद्र घोडके,नकाते सर,रामदास कोरे,यांच्यासह बसव प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top