तेर /प्रतिनिधी 

राज्य पुरस्कृत सोयाबीन व इतर गळीतधान्य उत्पादकता वाढ आणि मूल्य साखळी विकास योजना कार्यक्रमांतर्गत प्रधान सचिव कृषी  एकनाथजी डवले यांनी वानेवाडी ता. उस्मानाबाद येथे शेतकऱ्यांची संवाद साधला.

     यावेळी त्यांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये सहभागी होऊन सोयाबीन पिकाचे उत्पादन वाढीकरीता आवश्यकता उपाययोजनांची अंमलबजावणी करावी असे आवाहन केले. कृषी क्षेत्रात उत्पादन वाढ झाली तरच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल आणि या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपले उत्पन्न वाढविण्याची संधी आहे तरी शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा. कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी याकरिता शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करतील असे ते म्हणाले.

या वेळी प्रगतिशील शेतकरी  रेवणसिद्ध लामतुरे यांनी सोयाबीन पेरणी करताना रासायनिक खता सोबतच जीवामृत याची पेरणी करण्यासाठी च्या बनविलेल्या पेरणी यंत्राची त्यांनी पाहणी केली व या उपक्रमाची प्रशंसा केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी सहाय्यक वैभव लेनेकर  यांनी केले.

या कार्यक्रमासाठी जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी उस्मानाबाद  राहुल गुप्ता, विभागीय कृषी सहसंचालक . साहेबराव दिवेकर ,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी . महेश तीर्थकर, उपविभागीय कृषी अधिकारी . उमेश बिराजदार ,कृषी उपसंचालक  .अभिमन्यू काशीद ,तालुका कृषी अधिकारी .डी आर. जाधव मंडळ कृषी अधिकारी सत्यजीत देशमुख कृषी पर्यवेक्षक डी.पी. मोहिते , गुरुलिंग स्वामी बालाजी स्वामी, सरपंच जयश्री उंबरे, उपसरपंच गोविंद उंबरे  पोलीस पाटील मनीषा घेवारे व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 
Top