उमरगा  / प्रतिनिधी- 

त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या वतीने येथील तगरभुमी कॉम्प्लेक्स,गुंजोटी काॅर्नर रोड,येथे गुरुवारी दि 26 मे तें 30 मे या कालावधीत सिगालवाद सुत्त या विषयावर निवासी धम्मप्रशिक्षण शिबिराचें आयोजन केलें आहे. शिबिराचे नेतृत्व बौद्ध धम्माचें गाढे अभ्यासक साहित्यिक धम्मचारी सुचिरत्न (औरंगाबाद )हे करणार आहेत. बौद्ध बांधवानी शिबिरात दाखल व्हावे असे आवाहन त्रिरत्न बुद्धीस्ट सेंटरचें चेअरमन धम्मचारी रत्नपालीत यांनी केलें आहे.

 या शिबिरात धम्मचारी प्रज्ञाजीत, धम्मचारी रत्नपालीत, धम्मचारी ज्ञानपालीत, धम्मचारी कल्याणदस्सी, धम्मचारी धम्मभूषण, धम्मचारी विबोध आदींचे प्रवचणे होणार आहेत . तथागत भगवान बुद्धानी सिगालवाद सूत्तात गृहस्थी लोकांना दिलेला उपदेश आजही तंतोतंत लागू असून आपल्या घरात कुटूंबात समाजात जीवन जगत असताना कसे जीवन जगावे मनुष्यमात्राचा खरा धर्म कोणता याविषयी शिकवण दिली आहे. सिगालवाद सुत्त या महत्वपुर्ण विषयावर हे अभ्यास शिबीर घेण्यात येत असून शिबिर पूर्ण मोफत आहे.शिबिरार्थीला कोणतीही फीस आकारण्यात येणार नाही दाखल होणाऱ्या शिबिरार्थीना जेवण,नाष्टा, चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. धम्म जाणून शिलाचे पालन करण्याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाणार असून दररोज रात्री  अभ्यासा व्यतिरिक्त वेगवेगळ्या विषयावर प्रवचने होणार आहेत. महिलां व पुरुषांची राहण्याची  स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे, शिबिरात ध्यान, पूजा, संपर्कसराव, व्यक्तिमत्व विकास यावर भर दिला जाणार असून .शिबिरात बौद्ध धम्मदिक्षेचा सोहळा होणार असून दिक्षार्थिनी लिखित विनंती अर्ज करावा सर्व नवदीक्षितांना प्रमाणपत्र  देण्यात येणार असल्याचे आवाहन धम्मचारी रत्नपालीत यांनी केलें आहे. 

 
Top