तुळजापुर / प्रतिनिधी-

तुळजापुर शहरातील खटकाळ गल्ली येथे नरसिंह जयंती उत्साहात साजरी करण्यात आली गेल्या अनेक वर्षा पासुन नरसिंह मंडळाच्या वतीने हि जयंती साजरी करण्यात येते या वेळी हजारो भक्तांना अन्न्दान करण्यात येते भाविक मोठया भक्ती भावाने अन्न्दानासाठी देणगी व शिधा देता यातुनच अन्न्दान केले जाते.

 कोरोणामुळे दोन वर्ष जयंती साजरी झाली नाही केवळ प्रसाद वाटप केला जात होता. या वर्षी कोरोणाचे सावट कमी झाल्यामुळे नरसिंह जयंती उत्साहात साजरी होत आहे. या जयंती साठी भाविकांसाठी मंडप टाकला जातो नरसिंहांच्या मुर्तीचा अभिषेक झाल्यानंतर मुर्तीस फुलांनी सजवले जाते. या साठी श्रीकांत कांबळे , बाळासाहेब नाईकवाडी , अमोल डाके , सचिन डाके, सुहास गायकवाड , धनंजय जमदाडे, आनंद नाईकवाडी , बाळासाहेब पलंगे , सुनिल राऊत , यांच्यासह असंख्य सदस्य मेहनत घेत असतात.

 
Top