तुळजापूर  / प्रतिनिधी-

 तालुक्यातील आरळी बु ते आरळी खुर्द मुख्य रस्त्यावर ओढ्यावरील अरुंद पूल हा अत्यंत धोकादायक बनला आहे,मागील अनेक वर्षांपासून याकडे संमधीत विभागाचे दुर्लक्ष होते आहे, दैनंदिन शेकडो वाहनांची ये जा यावरून होत असते, रस्त्याच्या बाजूला काटेरी झाडे वाढली असून  पुलाच्या दोन्ही बाजूची लोखंडी रेलिंग नाहीशी झाली असल्याने लहान मोठ्या वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे.

आरळी बु हे गाव आसपासच्या अनेक गावांसाठी मध्यवर्ती बाजार पेठ आहे,बँकिंग व्यवहार असो किंवा व्यवसायिक बाबींसाठी दैनंदिन शेकडो लहान मोठे वाहन ये जा करत असतात,आरळी बु येथे दहावी पर्यंत शाळा असल्याने विद्यार्थ्यांना याच मार्गावर प्रवास करावा लागतो,आरळी बु ते आरळी खुर्द दरम्यानचा खड्या खड्यांचा खराब रस्ता आणि अरुंद पूल धोकादायक बनला असून तात्काळ नवीन पूल बनवा अशी मागणी होत आहे.

बसवंतवाडी - आरळी बु - काळेगाव पर्यंतचा प्रमुख रस्ता मागील 10 ते 15 वर्षापासून उखडला गेला आहे यामुळे सर्व प्रवाशी वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे,लोकप्रतिनिधी सातत्याने रस्ता दुरुस्ती करावा अशी मागणी करत असतात तरी संमधीत विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसुन येते आहे.

 
Top