तुळजापूर  / प्रतिनिधी-

 तिर्थक्षेञ तुळजापूरात सीएनजी गँस भरण्यासाठी एकच केंद्र असल्याने सीएनजी गँस भरण्यासाठी सीएनजी गँस भरण्यासाठी एक  किलोमीटर पर्यंत रांगा लागत असल्याने सीएनजीगँस वितरण केंद्र तिर्थक्षेञ तुळजापूर वाढविण्यात याव्यात अशी मागणी होत आहे.

सध्या लग्नसराई उन्हाळी सुट्यांन भाविक खाजगी वाहनांनी मोठ्या संखेने येत आहेत. यात सीएनजी गँस वर चालणाऱ्या वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना सीएनजीगँस भरण्यासाठी नळदुर्ग रोडवर एक सेंटर आहे. सीएनजी गँस वितरण एकच सेंटर असल्याने येथे गँस भरण्यासाठी एक ते दोन किलोमीटर रांगा लागत आहे. 

 सीएनजीगँस टंचाई 

वाढत्या सीएनजीगँस वाहनांचा पार्श्वभूमीवर येथे सीएनजीगँस टंचाई जाणवत असुन अनेक वाहने  सीएनजी गँस उपलब्ध नसल्याने नाईलाजास्तव पेट्रोल डिझेल टाकुन खर्चिक प्रवास करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर जशी सीएनजी गँस वरील वाहने वाढवली तसेच वितरण सेंटर वाढविण्याची मागणी होत आहे.

 
Top