उस्मानाबाद / प्रतिनिधी-

काँग्रेस पक्षाचे उस्मानाबाद जिल्हा कार्याध्यक्ष खलील सय्यद यांची ओरिसा राज्यातील गंजम येथे जिल्हा निवडणूक निरीक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल खलील सय्यद यांचा काँग्रेस पदाधिकार्‍यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

आखिल भारतीय काँग्रेस कमिटीमार्फत पक्षांतर्गत निवडणुका होऊ घातल्या आहेत. याचा सदस्य नोंदणीचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून मतदार यादीचे काम सुरू आहे. ओरिसा राज्यातील गंजम जिल्ह्यातील पक्षाचे जिल्हाध्यक्ष, सर्व ब्लॉक अध्यक्ष प्रदेश कार्यकारिणी सदस्य  यांच्या निवडणुका घेण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निर्देशानुसार उस्मानाबाद जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सय्यद खलील यांची जिल्हा निवडणूक निरीक्षक म्हणून मुख्य निवडणूक निरीक्षक मधुसूदन मिस्त्री यांनी नियुक्ती केली आहे. ओरिसा येथे श्री. सय्यद हे पक्षाचे जनसंपर्क प्रमुख खासदार नीरज डांगी, सहायक जनसंपर्क प्रमुख अमिताभ चॅटर्जी व संदीप सिंग यांच्यासोबत काम करणार आहेत.

या नियुक्तीबद्दल खलील सय्यद यांचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष मोहम्मद आरिफ नसीम खान, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार हुसेन दलवाई, अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष एम.एम. शेख, माजी जिल्हाध्यक्ष विश्वास शिंदे, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.धीरज पाटील, विचार विभागाचे राष्ट्रीय समन्वयक अ‍ॅड. राज कुलकर्णी, प्रदेश प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस, अल्पसंख्यांक विभागाचे मराठवाडा अध्यक्ष अहमद चाऊस, मुख्य संघटक राजाभाऊ शेरखाने, सेवादल जिल्हाध्यक्ष विलास शाळू, कळंब तालुकाध्यक्ष पांडुरंग कुंभार, उस्मानाबाद तालुकाध्यक्ष रोहित पडवळ,  सांस्कृतिक विभागचे प्रदेश उपाध्यक्ष आरिफ शेख, प्रदेश संघटक अहेमद चाऊस सलमान शेख, रोहन जाधव, माजी युवक जिल्हाध्यक्ष दर्शन कोळगे, प्रदेश युवा सचिव उमेश राजेनिंबाळकर, सेवादल शहराध्यक्ष अतुल चव्हाण, मानवी हक्क विभाग वरिष्ठ उपाध्यक्ष हबीब शेख, जेष्ठ नेते अशोक बनसोडे, अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष जमीर सय्यद, अजहर पठाण, मूहिब अहेमद, संतोष पेठे यांनी अभिनंदन केले आहे.

 
Top