उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 अनंतदास महाराज स्मारक मंडळाच्या वतीने वेदपाठशाळा उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला. याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष ॲड. मिलिंद पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी पद्मनाभ व्यास महाराज यांनी पुराण व संत वाङ्मयाच्या आधारे वेदांचे महत्व स्पष्ट केले.

शेषाद्री (अण्णा) डांगे यांनी उद्घाटकीय भाषणात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये भारतीय संस्कृतीच्या पुनरुत्थानाचे महत्व प्रतिपादित करताना वेद हे भारतीय ज्ञान परंपरेचे प्रतीक आहेत असे प्रतिपादन केले.

याप्रसंगी वेदमूर्ती आचार्य शेखर कुलकर्णी- चोराखळीकर, आचार्य धनेश जोशी, व्यवस्थापक निलेश कुलकर्णी व वेदपाठाचे प्रशिक्षण घेणा-या बटूंचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते झाला.

या वेळी डॉ. अभय शहापूरकर, प्रशांत कुदाळ, कमलाकर पाटील, वंदनाताई गपाट, जयश्रीताई कुलकर्णी, गिरीश कुलकर्णी, डॉ. ऊर्मिलाताई गजेंद्रगडकर यांनी या वेदपाठशाळेच्या नूतन उपक्रमास शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी गोविंदराव अयाचित, आर. डी. कुलकर्णी, रामचंद्र गुंडोपंत कुलकर्णी,अतुल चिक्षे, संतोष शेटे उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या आरंभी मीरा ठाकुर मॅडम व विद्यार्थिनींनी ‘सरस्वती वंदना’ सादर केली. सूत्रसंचालन प्रा. डॉ. विनोदकुमार वायचळ यांनी केले तर आभार राम सोनटक्के यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता वेदपाठशाळेच्या ब्रह्मचारीगणांनी शांतिपाठाने केली.अनेक अध्यात्मिक मुलांना या वेदशाळेचा फायदा होणार आहे. 

 
Top