परंडा  / प्रतिनिधी-

प्रतिकुलता कीतीही आली तरी भंगवंताचे नामस्मरण केल्याने ती अनुकूलतेत बदलते,दुख सरल पाहीजे,सुख उरल पाहीजे त्यासाठी परमार्थ केला पाहीजे, संताची संगती लाभली तर काही मागणी रहात नाही, संताची संगत लाभली की माणूस तृप्त होतो,संताच्या संगीतत जीवन परिवर्तन होते, संत संगतीशिवाय देव भेटत नाही, जिवणात काहीही मिळेल पण खर्या साधुसंताची भेट होण आवघड आहे असे कीर्तनातुन ह.भ प. श्री कुमार महाराज केमदारणे सांगत होते.

श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथीनिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह निमित्त आज बुधवार रोजी ह.भ.प. श्री कुमार महाराज केमदारणे यांची किर्तन सेवा पार पडली. प्रथम डाॅ. संजय जहागीरदार, श्री सुग्रीव होते व पत्रकार श्री गोरख देशमाने यांची महाराजांना पुष्पहार अर्पण केला. 

यावेळी कल्याणसागर समुहाचे संस्थापक/मार्गदर्शक  विकास कुलकर्णी, नाना गवारे, मधुकर भांडवलावर, अरुण बुरांडे, शाम पाटील, अंकुश जमदाडे, भोरे आप्पा, सुमित कठारे, मुकुंद देशमुख, मच्छिंद्र घाडगे, हिरालाल खर्डेकर, ज्ञानोबा शिंदे, दत्तात्रय हादगावकर, बळीराम कोळी, मुरलीधर बोराडे, रोहण गवारे, अभिजित नलवडे उपस्थित होते.

सायंकाळी सात वाजता समर्थ नगर परिसरात टाळ मृदुंग सह दिंडी प्रदक्षिणा करण्यात आली यासाठी महिला पुरुष युवक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते, जागोजागी सडा, रांगोळी , औक्षण करून सर्व ठिकाणी दिंडीचे स्वागत करण्यात आले.


 
Top