उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांच्या २५६६ व्या जयंतीनिमित्त स्मृती बुद्ध विहार समिती व दि बुध्दिष्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने त्रिवार वंदन करण्यात आले, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले, सामुदायिक बुद्ध वंदना घेण्यात आली. 

प्रथमतः पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करुन सलामी देण्यात आली,अवघ्या जगाला युद्ध नको तर बुध्द पाहिजे अशी विचारधारेची मानसिकता झाली असुन बुध्द धम्माच्या विचारा शिवाय पर्याय नाही, अभिवादन कार्यक्रमात मराठी आवृत्तीत अनुवादन करणारे विनायक विठ्ठल जगताप,डॉ.अनुपमा विनायक जगताप यांचे भगवान बुद्धांची सचित्र जीवनी या पुस्तकाच्या प्रती वाटण्यात आल्या.तर दि बुध्दिष्ट सोसायटी ऑफ इंडियाचे मुखपत्र धम्मयान मासिकाचेही वाटप करण्यात आले.तर बाजुला असणारे फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीच्या नियोजीत जागेतील बोधी वृक्षास (पिंपळ वृक्ष) पुष्प अर्पण करण्यात आली.रवि बनसोडे,कुमार लोंढे,बाळु बनसोडे यांनी दुध खिर दान केली.

यात प्रामुख्याने शिलाताई चंदनशिवे,बबिताताई लगाडे, जयश्रीताई चव्हाण,बौध्दाचार्य गुणवंत सोनवणे,बौध्दाचार्य बाबासाहेब बनसोडे,बौध्दाचार्य धनंजय वाघमारे,तेरणेचा छावाचे संपादक,पत्रकार पांडुरंग मते,गणेश रानबा वाघमारे,बापु कुचेकर, संपतराव शिंदे,रमेश कांबळे,अनुरथ नागटिळक, स्वराज जानराव,सिद्राम वाघमारे,अरुणभाऊ बनसोडे,बाबासाहेब बनसोडे,के. टी.गायकवाड,अतुल लष्करे,दयानंद वाघमारे,रवि सुरवसे,भाऊसाहेब अणदुरकर,चंदनशिवे सर,विजय गायकवाड,अक्षय कांबळे,प्रशांत बनसोडे, भैय्या ओव्हाळ अन्य इतर उपस्थित होते.

 
Top