तुळजापूर / प्रतिनीधी-
शेतकऱ्यांच्या घरात धनधान्याची रास वाढुन शेतमालाला सोन्याचा भाव मिळू दे शेतकऱ्यांना हे वर्ष सुख शांती समाधानाचे जावू दे असे साकडे श्रीतुळजाभवानी मातेला घातल्याची माहीती माजीमंञीजीआ सदाभाऊ खोत यांनी देवीदर्शन नंतर पञकारांशी बोलताना सांगितले यावेळी जिल्हाअध्यक्ष नितीन काळे राजसिंह निंबाळकर नारायण नन्नवरे अदि प्रमुख पदाधिकारी उपस्थितीत होते यावेळी पञकारांशी संवाद साधताना खोत म्हणाले कि महाविकासआघाडी कडुन ऐका समाजाला टारगेट करुन बहुजन समाजाची सहानुभूती मिळवण्याची खेळी गेली अनेक वर्षापासुन चालु आहे.
सध्याच्या राजकिय परिस्थिती वर भाष्य करताना खोत म्हणाले की दुसऱ्याचा वेदनेला फुंकर घालुन राजकारण्याचा अड्यावरती लोकांच्या मनाला हात घालुन त्या ठिकाणी त्यांच्या भावनेशीखेळता येते परंतु ज्यांच्या दुखावर तुम्ही फुंकर घालत आहात त्यांच्या च दुखावर साठ वर्ष तुम्ही मीठ चोळण्याचे काम या राज्यात केले हे विसरता हे दुर्दवी आहे असे महाविकासआघाडी वर टीका करताना म्हणाले ,
देवदेवतांन वर आरोप केले जात आहेत. देवदेवतांन वरील आरोप बाबतीत भाष्य करणाऱ्यांची जिरवण्याचा प्रयत्न केला जातो औरंगजेब बाबतीत बोलताना यांच्या जिभेला लगाम असतो असे यावेळी म्हणाले .आता आमचा लढा वाडा विरुध्द गावगाडा असल्याचे यावेळी म्हणाले . चितळे पोस्ट ला आपण सामर्थन करता का यावर बोलताना खोत म्हणा कि ती विशीष्ट समाजाची आहे म्हणून तिला टारगेट केले जातय केतकीला मानावेच लागेल ती कणखर आहे ती कोर्टात ऐकटीच लढली तिला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर तिच्यावर हल्ला झाला हा सरकार पुरकृत आतंकवाद नाही का असा आरोप केला.
आ . मिटकरी यांचे ब्राम्हण समाजाला बोलणे नैतिकतेला धरुन होते का असा सवाल करुन आमचे देवेद्र फडणवीस अमृता फडणवीस चंद्रकांत पाटील यांच्या बाबतीत केलेले वक्तव्य नैतिकतेला धरुन होते का असा सवाल करुन हल्ला झाला कि प्रतिहल्ला होतच असतो असे शेवठी म्हणाले
भाजपा जिल्हाअध्यक्ष नितीन काळे यांनी माजीमंञीजीआ सदाभाऊ खोत यांचा भगवी शाल घालुन सत्कार केला.
यावेळी तालुकाध्यक्ष संतोष बोबडे अविनाश गंगणे सुहास सांळुके विकास मलबा अदि उपस्थितीत होते