उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

तथागत गौतम बुद्ध यांच्या २५६६ व्या बुद्ध पौर्णिमा निमीत्त लुम्बिनी बाग तांबरी विभाग येथे अभिवादन करण्यात आले, महामानव बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन बुद्ध वंदना घेण्यात आली, मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात तथागतांचा धम्म बुद्ध धम्मच जगाला तारणार असुन बुद्ध धम्माच्या विचारांची अवघ्या विश्वाला गरज आहे, अभिवादना नंतर खिर दानाचा आस्वाद आलेल्या पाहुण्यांनी व उपस्थित महिला भगिनी बांधव यांनी घेतला,यावेळी राजेंद्र धावारे सर,मिशन वात्सल्य समन्वयक समितीचे सदस्य गणेश रानबा वाघमारे,अक्षय पाचपिंडे, विष्णू वाघमारे,ज्ञानेश्वर ढावरे,शशिकांत गंगावणे, अविनाश कांबळे,प्रशांत शिंदे,राजाभाऊ जानराव, सुरेंद्र हौसलमल,मीनाताई मेश्राम, कल्पना ढावरे,राजश्री धावारे, माया वाघमारे,विमल पाचपिंडे,विद्याताई वाघमारे, पार्वतीताई कांबळे,विद्याताई शिंदे,भाग्यश्री गंगावणे, प्रियंका धावारे,सुष्मिता गंगावणे,अॅड.अर्चनाताई वाघमारे,वत्सलाताई ओहाळ,वर्षा वाघमारे, रमाताई पायाळ,प्रियंका भोसले,विमलताई वाघमारे, आशाताई सोनवणे,आरती कांबळे,आम्रपाली पाचपिंडे, कामाक्षी खुने इत्यादी उपासक/ उपासिका सहभागी झाले. याप्रसंगी सुयश कांबळे,मीनताई मेश्राम,एड वाघमारे ताई यांनी विचार व्यक्त केले. सूत्रसंचालन राजेंद धावारे यांनी केले तर आभार प्रशांत शिंदे यांनी मानुन खीरदानाने सांगता करण्यात आली.

 
Top