उस्मानाबाद / प्रतिनिधी-

कळंब  तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेने राज्यात  चांगला आदर्श निर्माण करुन लौकिक मिळवला  असुन  या संस्थेस गेल्या आर्थिक  वर्षात सन २०२१-२०२२ मध्ये ७४ लाख रुपये इतका विक्रमी नफा झाला असल्याची माहीत शिक्षक पतसंस्थेचे अध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी दिली आहे.

कळंब तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेत गेल्या १७ वर्षापासून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या विचाराच संचालक मंडळ कार्यरत आहे. या १७ वर्षाच्या कार्यकाळात संचालक मंडळाने संस्थेत विविध कल्याणकारी योजना राबवून व नियमित वसुली करुन पतसंस्थेच्या प्रगतीचा आलेख सतत उंचावत ठेवण्यात यश मिळवले आहे.

पतसंस्थेचे जिल्ह्यात ७९० सभासद असुन भागभांडवल ४ कोटी ४७ लाख , सभासदांच्या कायम ठेवी २० कोटी ,मुदत ठेवी ८ कोटी २५ लाख, गंगाजळी ५० लाख,इमारत निधी ३१ लाख,शिक्षक कल्याण निधी ५५ लाख रुपये संस्थेत जमा आहेत . गेल्या आर्थिक वर्षात संस्थेला  २ कोटी ७१ लाख रुपये उत्पन्न मिळाले असुन  सर्व तरतुदी करुन निव्वळ नफा  ७४ लाख रुपये झाला आहे.तर गेल्या आर्थिक वर्षात वार्षिक उलाढाल ५२ कोटी रुपये झाली आहे.

कळंब तालुका शिक्षक सहकारी पतसंस्था ही कोणत्याही बँकेकडुन कर्ज न घेता स्वभांडवलावर कर्ज देणारी पतसंस्था  असून जिल्ह्यात सर्वात कमी ८-५० टक्के व्याजदराने कर्ज देणारी एकमेव पतसंस्था आहे.सभासदांच्या मुलीच्या लग्नप्रसंगी शुभमंगल कन्यादान योजनेतून वधू ला  ११ हजार रुपयाचे कन्यादान दिले जाते.  सभासदांना प्रत्येक  वर्षी उच्चांकी १५ टक्के लाभांश देणारी राज्यातील एकमेव शिक्षकांची पतसंस्था आहे तसेच सभासदास कोणत्याही कारणांमुळे मृत्यू आला तर पतसंस्था त्या सभासदाचे शिक्षक कल्याण निधीतून संपुर्ण कर्ज माफ करते अशा लोककल्याणकारी व पारदर्शी कारभारामुळे संस्थेला आजपर्यत सतत आँडीट वर्ग “अ” मिळत आलेला आहे

सभासदांच्या गुणवंत पाल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक वर्षी रोख बक्षीस देऊन त्यांचा सन्मान करणारी ही संस्था असून जिल्ह्यात सर्वात जास्त आर्थिक उलाढाल असलेली कळंब शिक्षक पतसंस्था आहे. सभासदांची पतसंस्थेप्रती असलेली निष्ठा,प्रेम व नियमित वसुली होत असल्यामुळेच संस्थेच्या प्रगतीचा आलेख सतत उंचावत ठेवण्यात संचालक मंडळाला यश आले आहे असे श्री. तांबारे म्हणाले.

 संस्थेच्या प्रगतीसाठी संस्थेचे उपाध्यक्ष श्री.भूषण नानजकर,संचालक भक्तराज दिवाने,शिवराज मेनकुदळे,चंद्रकांत शिंदे,गणेश कोठावळे,तोफीक मुल्ला,सतिश ऐडके,पांडुरंग वाघ,दशरथ मुंढे,धनाजी अनपट ,नागेश टोणगे,अविनाश पवार,श्रीमती.वैशाली क्षिरसागर ,श्रीमती ज्योती ढेपे ,सचिव संतोष ठोंबरे, शिवाजी शिंदे,अविनाश डुमणे व शिक्षक संघाचे सर्व जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय पदाधिकारी,कार्यकर्ते व संभासद यांच्या सहकार्यामुळेच या संस्थेचा राज्यात लौकीक निर्माण होऊ शकला आहे असे श्री तांबारे म्हणाले

 
Top