परांडा/  प्रतिनिधी : - 

येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे. शिंदे महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ विशाल जाधव आणि हिंदी विभागाचे विभाग प्रमुख डॉ बी वाय माने यांना गोवा येथे अविष्कार फाउंडेशन कोल्हापूरच्या गोवा शाखेच्या वतीने सामाजिक कृतज्ञता सन्मान पुरस्काराच्या समारंभात राष्ट्रीय  बेस्ट टिचर्स पुरस्काराने सन्मानित  करण्यात आले.दि.८ मे रोजी पणजी गोवा येथे आयोजित कार्यक्रमात सदर पुरस्काराचे वितरण करण्यात आले होते.

जाधव व माने यांना मिळालेल्या या सन्मानामुळे आणि पुरस्कारामुळे शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिदे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ दीपा सावळे यांच्या हस्ते बुके देऊन सत्कार करण्यात आला.

     या सत्कार समारंभ प्रसंगी महाविद्यालयाचे स्टाफ सेक्रेटरी डॉ शहाजी चंदनशिवे ,आय क्यु एसी चे चेअरमन डॉ महेशकुमार माने , ग्रंथपाल डॉ राहुल देशमुख, डॉ अतुल हुंबे , प्रा तानाजी फरतडे ,वरिष्ठ लिपिक  बाबासाहेब क्षिरसागर आदी कर्मचारी यावेळी उपस्थित होते .यावेळी प्राचार्या डॉ दीपा सावळे यांनी अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या . महाविद्यालयातील प्रत्येक प्राध्यापकांनी शैक्षणिक व सामाजीक क्षेत्रामध्ये  उल्लेखनीय कार्य करून महाविद्यालयाचा विकास व नावलौकिक करावा असे त्यांनी यावेळी  सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ शहाजी चंदनशिवे यांनी केले व डॉ राहुल देशमुख यांनी आभार मानले . 

 
Top