उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद तालुक्यातील आळणी येथील शेतकर्यांची 40 वर्षापासुन च्या मागणीला खेड साठवण तलावाच्या बुडीत क्षेत्रातील मौजे आळणी शिवारात नळकांडी पुलाचे बांधकाम कामास आज अखेर आमदार कैलास दादा पाटील व शेतकऱ्यांच्या पाठपुरव्याने यश आले.या कामास प्रारंभ झाला.या कामाचे शुभारंभ् आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते  करण्यात आला.

यावेळी सर्व शेतकऱ्यांंच्या चेहऱ्यांवर आनंद होता.याप्रसंगी शेतकऱ्यांनी आमदार कैलास दादा पाटील यांचे हार पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.याप्रसंगी आळणी गावचे माजी सरपंच तथा शिवसेना उपतालुकाप्रमुख धनंजय वीर,तेली समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर,साहाय्यक कार्यकारी अभियंता अमृत सांगळे,कनिष्ठ अभियंता अजय गुजर,रहेमान भाई काझी,आळणी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष शामसुंदर लावंड,युवासेना तालुकाप्रमुख वैभव वीर,ग्रामरोजगार सेवक दादासाहेब गायकवाड,शाखाप्रमुख अजित वीर,सुनिल माळी,शेतकरी बुबासाहेब कदम,अरूण आबा म्हेत्रे,साहेबराव कदम,महेश कदम,विजय माळकर,नरेंद्र वीर,राजपाल पाटील,गजुभाई पडवळ,मुन्ना वीर,विनोद वीर,बालाजी तौर,आदिंची उपस्थिती होती.

 
Top