परंडा / प्रतिनिधी : - 

डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अंतर्गत असणाऱ्या उस्मानाबाद जिल्ह्यातील उपकेंद्रास स्वतंत्र विद्यापीठाचा दर्जा मिळावा या मागणीसाठी तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद या विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य तथा श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद या संस्थेचे सचिव संजय निंबाळकर यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ येथील तहसीलदार रेणुकादास देवणीकर यांना शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे  शिंदे महाविद्यालय आणि संत गाडगेबाबा महाविद्यालय परंडा यांच्या वतीने सोमवार दि.३०रोजी निवेदन  देण्यात आले.महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ दीपा सावळे यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांसह तहसील कार्यालय परंडा येथे सदर निवेदन देण्यात आले व निवेदनाची प्रत  जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद , कुलगुरू डॉ प्रमोद येवले डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद, संचालक उच्च शिक्षण व तंत्र शिक्षण विभाग मंत्रालय मुंबई ,मा.उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत मंत्रालय मुंबई आणि मा राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांना या निवेदनाच्या प्रती देण्यात आल्या. 

  यावेळी सदरनिवेदन देताना तहसील कार्यालय येथे डॉ शहाजी चंदनशिवे यांनी प्रास्ताविक केले तर प्राचार्या डॉ दीपा सावळे यांनी मनोगत व्यक्त केले . यावेळी महाविद्यालयातील आय क्यु ए सी  चे चेअरमन डॉ महेशकुमार माने , कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा दत्ता मांगले ,कार्यालयीन अधिक्षक श्री भाऊसाहेब दीवाने, संत गाडगेबाबा महाविद्यालयाचे समन्वयक अनिल जानराव याच महाविद्यालयाच्या प्राध्यापिका सौ सूर्यवंशी मॅडम यांच्यासह कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

 
Top