उस्मानाबाद /प्रतिनिधी-

महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका उस्मानाबाद यांच्या वतीने मनसे केसरी कुस्ती मैदान घेण्यात आले . या मैदानासाठी उद्घाटक म्हणून मनसे नेते दिलीप बापू धोत्रे, आयोजक तालुकाध्यक्ष पाशाभाई शेख , वीज कामगार सेना राज्य सचिव विशाल कांबळे साहेब , शहराध्यक्ष नवनाथ चव्हाण, तालुका सचिव शिवानंद ढोरमारे पोलीस निरिक्षक बुधवंत, जिल्हा संघटक अमरराजे कदम निलेश जाधव कुस्तीप्रेमी ओंकार नायगावकर . युवा नेते अभिराम पाटील, नगरसेवक राणा बनसोडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते .

 या मैदानासाठी राज्यभरातून तीनशे ते साडेतीनशे पैलवानांनी सहभाग नोंदवला . यामध्ये काही मानाच्या चांदीच्या सहा कड्यावर कुस्त्या लावण्यात आल्या . पाच तोळे चांदीच्या कड्याचे विजेते पैलवान आकाश भोसले तुळजापूर, दत्ता मेटे वाशी, आदित्य कांबळे परंडा, धीरज बारस्कर भूम ,सुरज हलगुडे तुळजापूर, लक्ष्मण जाधव परंडा हे सहा नामवंत पैलवान चांदीच्या कड्याचे मानकरी ठरले. तर मनसे केसरी किताबाच्या लढतीसाठी चांदीची गदा व 11,111 रुपये असा किताब होता .या मनसे केसरी किताबाच्या लढतीसाठी 14 पैलवान मैदानामध्ये उतरले होते . 14 पैलवानामध्ये राउंड पद्धतीने कुस्त्या घेण्यात आल्या .यामध्ये प्रमोद सुळ व इम्रान शेख यांनी झुंजार खेळी करून अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळवला. अंतिम लढतीत धाराशिवचा पै . इम्रान शेख हा पैलवान पहिल्या मनसे केसरी किताबाचा मानकरी ठरला . तर प्रमोद सुळ उपविजेता ठरला. अशाप्रकारे मनसे केसरी किताबाचे मैदान अतिशय उत्साहात व शांततेत संपन्न झाले . या मैदानासाठी पंच म्हणून विभागीय सचिव वामनराव गाते, गोविंद घारगे ,दिनकर जाधवर, बाळासाहेब शिंदे, अनिल अवधूत, विनोद पवार नवज्योत शिंगाडे ,माऊली रोडगे, यांनी कामकाज पाहिले .तर हे मैदान यशस्वी करण्यासाठी मनसे आयोजक मनसे धाराशिव तालुकाध्यक्ष पाशाभाई शेख, वीज कामगार सेना राज्य सचिव कांबळेसाहेब, मनसे शहराध्यक्ष नवनाथ चव्हाण, तालुका सचिव शिवानंद ढोरमारे महाराष्ट्र सैनिक आझाद शेख, आनिकेत शेख यांनी परिश्रम घेतले .

 
Top