उस्मानाबाद / प्रतिनिधी-

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे परिपञकानुसार २१जुन “आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त १४व२०मे२२रोजी व २१जुन२२ रोजी,विद्यार्थ्यांना योगाचे महत्व समजण्यासाठी “योग प्राणायम शिबिराचे”आयोजन करण्याच्या सूचना प्राप्त झाल्यानुसार रामकृष्ण परमहंस 

  महाविद्यालयातील एन. एस .एस व एन .सी .सी, आणि जिमखाना विभागाच्यावतीने शनिवार दि.१४ मे रोजी ,सकाळी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या तयारी निमित्त “योग प्राणायाम याचे मानवी जीवनातील महत्त्व” या विषयावर प्रबोधनपर व्याख्यान आयोजीत करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उस्मानाबाद जिल्हा शल्य रुग्णालयातील योग तज्ञ, श्री मनोज पतंगे उपस्थित होते.अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख होते.

यावेळी उपप्राचार्य प्रा.डाॅ.शांतीनाथ घोडके,एन.एस.एस.प्रकल्पअधिकारी प्रा.बालाजी नगरे,एन.सी.सी.प्रमुख डाॅ.केशव क्षीरसागर,जिमखाना प्रमुख प्रा.श्रीराम नागरगोजे उपस्थित होते.प्रारंभी प्रमुख मान्यवरांनी छञपती संभाजी राजे यांची जयंती असल्याने त्यांचे प्रतिमाचे पुजन केले.

यावेळी श्री.मनोज पतंगे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, आजच्या काळात मानवी जीवन धावपळीचे झाले असून माणसं तणावात वावरत आहेत व त्याचा परीणाम मानवी शरीरावर होत असल्याने आरोग्य विस्कळीत होत आहे.आजच्या विद्यार्थ्यांनी तंदुरूस्त रहाण्यासाठी नियमितपणे योगा केला पाहिजे.यावेळी त्यांनी योगाचे विविध प्रकार विद्यार्थ्यांचेपुढे सादर केले व कांही योगाचे प्रकार विद्यार्थ्याकडून करून घेतले.अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख म्हणाले की,या महाविद्यालयात चांगले शिक्षण देतानाच, विद्यार्थी सुसंस्कारित बनावेत याचेही शिक्षण दिले जाते त्याचबरोबर विद्यार्थी सक्षम व्हावा यासाठी “योग प्राणामय शिबिरे”आयोजित केली जातात.मनोज पतंगे यांनी योगाचे महत्व सांगितलेले आहे,केवळ २१जुन रोजीच योगा न करता दैनंदिन जीवनात रोज योगा करण्याचे आवाहन केले.

प्रास्ताविक प्रा.श्रीराम नागरगोजे यांनी केले.सूञसंचालन डाॅ.केशव क्षीरसागर यांनी केले.आभार प्रा.बालाजी नगरे यांनी मानले.यावेळी विद्यार्थी—विद्यार्थिनी यांचेबरोबरच प्राध्यापकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top