उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जिल्हास्तरीय जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापन देखरेख समिती बैठकीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगांवकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच घेण्यात आली.या कचऱ्याचे शास्त्रशुध्द पध्दतीने विल्हेवाट लावण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले.राष्ट्रीय हरित लवाद यांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी या अनुषंगाने उस्मानाबाद

जिल्हयातील खाजगी दवाखाने, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रूग्णालये जनावरांचे दवाखाने, रक्त- लघवी पृथ:करण प्रयोगशाळा आदी वैद्यकीय अस्थापने मधून निर्माण होणाऱ्या जैव वैद्यकीय कचऱ्याचे शास्त्रोक्त पद्धतीने हाताळणी आणि विल्हेवाटी बाबत चर्चा करण्यात आली. जिल्हाधिकारी श्री.दिवेगावकर यांनी बैठकीस उपस्थित असलेल्या सदस्यांना या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच, सर्व वैद्यकीय अस्थापनांना आणि सामाईक जैव वैद्यकीय प्रक्रिया आणि विल्हेवाट केंद्रांना, जैव वैद्यकीय घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ चे पालन करण्याचे आवाहन केले.

 या बैठकीस उपप्रादेशिक अधिकारी परमेश्वर कांबळे, अपर जिल्हाधिकारी रुपाली आवले,निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी,लातूरचे महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे संतोष चव्हाण, लातूरचे महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी संजय राठोड,जिल्हा शल्यचिकीत्सक, डॉ.धनंजय पाटील, प्रतिनिधी डॉ. पांचाळ, पोलिस उप निरिक्षक ए.डी. शेख हे उपस्थित होते.

 
Top