तुळजापूर / प्रतिनिधी- 

 उस्मानाबाद  जिल्ह्यातील नळदुर्ग येथील मुस्लिम धर्मगुरु सगीर जागिरदार यांनी सर्व मुस्लिम धर्मीयांना आवाहन करून सांगितले आहे की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून, इतर धर्मीयांना कसल्याही प्रकारचा त्रास न होता, आजान म्हणावी . अजानसाठी भोंग्यांची परवानगी घ्यावी, आवाज ठरवून दिलेल्या मर्यादेतच असावा, आणि हे भोंगे रात्री १० ते पहाटे ५ या वेळेत बंद असावेत .

    मुस्लिम धर्मींयांच्या एका मोठ्या धर्मगुरूंनीच असे आवाहन करून दोन समाजील तेढ कमी करून सामाजिक सलोख्याचे व ऐक्याचे दर्शन घडविल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सर्व सहका-यांसह धर्मगुरू सागिर जागिरदार यांचा सत्कार केला . 

   या कार्यक्रमास मुलिम समाजाचे धर्मगुरू सागीर जागीरदार,   सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री . गोरे, श्री . मोटे, पोलीस कर्मचारी, मुस्लिम समाजातील मान्यवर व्यक्ती, मनसेचे जिल्हासचिव जोतिबा येडगे, नळदुर्ग शहराध्यक्ष अलिम शेख, शहर सचिव प्रमोद कुलकर्णी, उपाध्यक्ष रमेश घोडके, धनंजय मडोळे, अजय डांबरे यांचेसह हिंदु व मुस्लिम समाजातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते . पोलीस विभागाच्या वतीने धर्मगुरू सागीर जागीरदार  यांचा सत्कार सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री . गोरे यांनी केला . व या घटनेचा आदर्श संपूर्ण महाराष्ट्रानेच नव्हे तर देशाने घ्यावा असे सांगितले .

 
Top