उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबादच्या उपकेंद्राला स्वतंत्र विद्यापीठ करण्याच्या मागणीवरून आज रिपब्लिकन सेना आणि उस्मानाबादच्या उपकेंद्राचे व्यवस्थापन परिषद सदस्य संजय निंबाळकर यांच्यात वादविवाद झाला. यादरम्यान, निंबाळकर यांच्यावर शाईफेक करण्यात आली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे उस्मानाबाद उपकेंद्र येथे स्वतंत्र विद्यापीठ करण्याच्या मागणीवरून आज वाद झाला. मागणी करणारे व्यवस्थापन परिषद सदस्य संजय निंबाळकर यांच्यावर आज रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे मराठवाडा अध्यक्ष सचिन निकम यांनी हा विद्यापीठ विभाजनाचा घाट असल्याचा आरोप करीत व्यवस्थापन परिषदेच्या सभागृहाबाहेर शाईफेक केली.

आज व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीनंतर निंबाळकर हे इतर सदस्यासोबत बाहेर येत असताना कार्यकर्त्यांनी जोरदार निषेध केला. व त्यांच्यावर शाईफेक केली. या वेळी निकम आणि निंबाळकर यांच्या मध्ये वादविवाद देखील झाला. या वेळी गुणरत्न सोनवणे, पवन पवार, मनीष नरवडे, सचिन गायकवाड, राहुल वडमारे आदी कार्यकर्त्यानी जोरदार घोषणाबाजी केली.

 स्वतंत्र विद्यापीठ प्रक्रीया लवकर होईल- निंबालकर

या संदर्भात व्यवस्थापन परिषदेचे सदस्य संजय निंबालकर यांची प्रतिक्रिया विचारली असता राज्यात कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे विभाजन झाले नाही का, त्यामुळे शैक्षणीक विकासासाठी हे आवश्यक असते. माझ्यावर शाईफेक करणाऱ्याचा मी निषेध व्यक्त करतो, या शाई फेकीमुळे मी राबवित असलेल्या प्रक्रिया आणखी चालना मिळेल, असे मत व्यक्त केले. 

 
Top