परंडा / प्रतिनिधी-

गेल्या सात वर्षात महागाई रोखण्यात केंद्र सरकारला पूर्ण अपयश आल्याने रविवार दि.१५ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभागिय अध्यक्षा वैशालीताई मोटे, युवती प्रदेशअध्यक्षा सक्षणा सलगर, माजी नगराध्यक्ष जाकीर भाई सौदागर यांच्या नेतृत्वात भव्य आंदोलन करून जाहिर निषेध केला. तसेच आढवडा बाजारातील टिपू सुलतान चौकात महिलांच्या वतीने चुलीवर भाकरी करून महागाई विरोधात तीव्र निषेध करण्यात आला.तसेच शरद पवार यांच्या विरोधात फेसबुक वर आक्षेपार्ह मजकुर प्रसारित करणारी अभिनेत्री केतकी चितळेकर यांच्या वर कडक कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन पोलिस निरीक्षक सुनिल गिड्डे यांच्या कडे देण्यात आले.

   केंद्र सरकारच्या नाकर्ते पणामुळे महागाईचा भडका झाला असून घरगुती गॅस, पेट्रोल, डिझलचे भाव दुपटीपेक्षा जास्तीने वाढल्याने किराणा पासून ते सर्वच वस्तुची भरमसाठ भाव वाढ झाल्याने सर्व सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले असून गोरगरिबांना जगणे कठीण झाले आहे.तसेच देशभरात बेरोजगारी वाढली असल्याने हे आंदोलन केंद्र शासनाला जाग आणण्यासाठी करण्यात आले आहे.

  यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभागिय अध्यक्षा वैशाली मोटे , युवती प्रदेशअध्यक्षा सक्षणा सलगर, युवक अध्यक्ष महेबुब शेख, मा.नगराध्यक्ष जाकीर सौदागर, महिला जिल्हाध्यक्षा मनिषा राखुंडे, युवती जिल्हाध्यक्षा स्वाती ध्रवकर, महिला ता.अध्यक्षा स्वाती गायकवाड, स्वाती देशमुख यांनी महागाई विरोधात आपले मनोगत  व्यक्त करून केंद्र सरकार चा नाकर्ते पणाचा समाचार घेतला.

   यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संदीप पाटील, युवक चे प्रदेश सचिव अमोल काळे, मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष राहूल बनसोडे, बच्चन गायकवड, सचिन पाटील, धनंजय हांडे, शहर अध्यक्ष वाजीद दरवनी, बापू मिस्कीन ,अप्पा बनसोडे , हनुमंत गायकवाड, तनवीर मुजावर , झोंबाडे सर, बाबुराव काळे, बाळासाहेब बैरागी, जावेद मुजावर, मलिक सय्यद, मा.नगरसेवक संजय घाडगे, बब्बु जिनेरी, सरफराज कुरेशी, राजकुमार माने, संजना माने, रत्नमाला बनसोडे ,माजी जि.प.सदस्या अनिता जाधव, मा.प. स.सदस्या सुषमा शिंदे, दिपाली रगडे, वैशाली बैरागी, राखी देशुमुख,अनिता राऊत, यांच्या सह तालुक्यातील महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने आपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राहूल बनसोडे यांनी केले.


 
Top