तुळजापूर  / प्रतिनिधी-

 छत्रपती संभाजीराजेंना श्री तुळजाभवानीमंदीर  मुख्य  गर्भगृहात  दर्शनास मज्जाव करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी व संबंधित दोषीवर योग्य ती कठोर कारवाई करावी,अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने मंगळवार दि.१०रोजी श्रीतुळजाभवानी पुजारी मंडळ मध्ये पञकार परिषद घेवून केली.

   छत्रपती संभाजी राजे हे दिनांक  ९ रोजी रात्री ९ .१५ वाजता श्री तुळजाभवानीचे दर्शनासाठी आले असता  त्यांना श्री देविजींचे दर्शन घेण्यासाठी सह जनसंपर्क अधिकारी नागेश शितोळे यांनी मुख्य  गर्भगृहात  दर्शनास मज्जाव करून छत्रपती  छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान केला  तरी याचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत.  या प्रकरणी श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थान अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांनी माफी मागावी,अशी या पञकार परिषदेत अजय सांळुके, प्रशांत सोंजी, महेश गवळी,जीवनराजे इंगळे,अशोक फडकरी आदी पदाधिकारी यांनी पञकार परिषदेस संबोधित करताना केली. 

अवमान करणे प्रशासनाचा उद्देश नव्हता- तहसिलदार योगिता कोल्हे

 छञपती संभाजी महाराज यांचा सन्मान डावलण्याचा  अवमान करण्याचा आमचा हेतु नव्हता नाही. छञपती घराण्यांचा मंदीरात देवीला दिलेले   दुध प्रथमता घालण्याचा अधिकार आहे. छञपती संभाजी महाराज जर अभिषेक वेळेस आले असते तर त्यांना दुध घेवुन गाभाऱ्यात सोडले असते पण ते उशीरा आले तसेच त्यांनी येण्यापुर्वी आम्हाला कुठलीही कल्पना दिली नाही. आम्ही कलम ३६ची अमंलबजावणी केली आहे, या प्रकरणी छञपती संभाजी महाराज आम्हाला समजुन घेतील असे सांगुन 

अनेक व्हीआयपी आम्हाला गर्भगहात देवीदर्शन देण्यासाठी आग्रह धरत आहेत.या प्रकरणी आम्ही महाराष्ट्र शासनाचा विधी व न्याय विभागाला  देऊल  कवायत कलम  ३६ किंवा  अन्य नियमांचा येथे वापर करावयाच्या या बाबतीत सुचना मागविल्या आहेत आमचे काम अंमल बजावणी करणे आहे. अशी प्रतिक्रिया श्रीतुळजाभवानी मंदीरच्या प्रशासकीय अधिकारी तथा तहसिलदार योगिता कोल्हे यांनी दिली.

 मंदीर संस्थानचे परिपञक

  श्री तुळजाभवानी देवी ह्या सकल महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून देवूळ कवायत नियमावलीनुसार पुजारी , सेवेकरी , मानकरी यांचे अधिकार विहित आहेत. श्री छत्रपती संस्थान कोल्हापूर यांचे श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान येथे पंरपरेने चालत आलेले कुळाचार आजही नियमित सुरु आहेत. तथापि , िनांक 09 मे 2022 रोजी छत्रपती संभाजीराजे हे श्री देविजींचे नियमित पुजा विधी संपल्यानंतर दर्शनासाठी आले असता कलम 36 चे अनुपालनामुळे त्यांना गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेण्याबाबत गैरसोय झाल्याचे निदर्शनास आले आहे . याबाबत दिलगीर आहोत . यापुढे छत्रपती संभाजीराजे यांचे दौऱ्याचे वेळी , दर्शनाचे वेळी नियमित कुलाचार , पुजाविधी करावेत जेणेकरुन गाभारा प्रवेशाबाबत त्यांचे परंपरागत अधिकारांच्या बाबतीत गैरसोय होणार नाही व देवुळ कवायत कलम 36 चे अनुपालन देखील होईल . सदर आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करावी  अशी सुचना  .  श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान प्रशासकीय अधिकारी योगिता कोल्हे यांनी दिल्या 


 
Top