उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 जिल्हा रुग्णालयात कक्षसेवक बाबासाहेब नानासाहेब पवार (४०) उपचाराचे काम करत होते. तेव्हा भीमनगर येथील राणा महेंद्र बनसोडे तेथे आले. त्यांनी मद्यधुंद अवस्थेत पवार यांच्या कामावर आक्षेप घेऊन अडथळा केला. त्यांना पवार यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना बनसोडे यांनी शिवीगाळ केली व चापटीने मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिली. ही घटना गुरुवारी घडली. याप्रकरणी बाबासाहेब पवार यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी उस्मानाबाद शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 
Top