उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शहरातील अभियंता तथा बांधकाम व्यावसायिक राहुल गवळी यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या  शिबिरात 40 तरुणांनी रक्तदान केले.

 उस्मानाबाद शहरातील नामांकित अभियंता तथा बांधकाम व्यावसायिक असलेले राहुल गवळी यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त शासकीय रक्तपेढीच्या सहयोगाने सामाजिक बांधिलकी जोपासत रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी बालाजी गवळी, कुमार शुभम धनके, सुरज तांबे यांच्यासह तरुण उपस्थित होते. 

 यापूर्वीही राहुल यांनी सामाजिक बांधिलकीतून शहरातील चौकांचे सुशोभीकरण, कोरोनाकाळात बांधकाम मजुरांना किराणा किट वाटप, विद्यार्थ्यांना मदत, असे सामाजिक उपक्रम राबविलेले आहेत. 


 
Top