उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद या विद्यापीठाचे उपकेंद्र उस्मानाबाद येथे कार्यरत आहेत. सदर उपकेंद्रास स्वतंत्र विद्यापीठ म्हणुन कार्यान्वयीत करणे बाबतचा अहवाल शासनाने मागीतला आहे. या प्रस्तुत विषयास अनुसरुन डॉ.प्रकाश बच्छाव सह संचालक उच्च शिक्षण महाराष्ट्र राज्य यांनी उपकेंद्रास भेट दिली व सर्वांचे मत एकुन घेतले व विद्यापीठ उपकेंद्राची पाहणी केली. यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने सन्माननीय सह संचालक यांना निवेदन दिले.

उस्मानाबाद विद्यापीठ होण्याच्या धोरणातुन सोईस्कर रित्या सत्ताधाऱ्यांच्या राजकीय वेगवेगळया भुमिकेमुळे जिल्ह्यातील विद्यार्थी व नागरिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण होत आहे. या विषयावर परस्पर विरोधी वक्तव्ये चीड निर्माण करणारी असून आपण शासनाची अधिकृत भूमिका तात्काळ स्पष्ट करून उस्मानाबाद येथे स्वतंत्र विद्यापीठ मंजूर करावे, अशी आग्रही मागणी उस्मानाबाद जिल्ह्यातील विद्यार्थी व नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे.

उस्मानाबाद जिल्हयातील उपकेंद्राचे रुपांतर विद्यापीठामध्ये झाले तर जिल्हयातील शैक्षणिक गुणवत्तेला खरे अर्थाने प्रोत्साहन, चालना मिळेल व अनेकांना रोजगाराची संधी मिळवुन आर्थीक स्थर उंचावेल अशी आशा आहे. व आपण याचा सकारात्मक विचार करावा ही समस्त उस्मानाबाद जिल्हयाच्या वतीने आम्ही करत आहोत.

या प्रसंगी सिनेट सदस्य संजय निंबाळकर, ॲड.मिलींद पाटील, प्रा.देशमुख सर, प्रा.संभाजी भोसले,  भाजयुमो जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, भाजप शहराध्यक्ष राहुल काकडे, आत्मनिर्भर जिल्हा संयोजक सचिन लोंढे, युवा मोर्चा शहराध्यक्ष सुजित साळुंके, विद्यार्थी जिल्हा संयोजक विशाल पाटील, जिल्हा सहसंयोजक सलमान शेख, जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील नाईकवाडी, सचिव गणेश एडके, धनराज नवले, सागर दंडनाईक सह सर्व पक्षीय नेते, विद्यार्थी प्रतिनीधी व युवामोर्चाचे कार्यकर्ते उपस्थीत होते.

 
Top