उस्मानाबाद / प्रतिनिधी-

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उस्मानाबाद येथील उपकेंद्रास उच्च शिक्षण संचालनालय, पुणेचे सहसंचालक डॉ.प्रकाश बच्छाव यांनी भेट दिली.  उपकेंद्रास स्वतंत्र विद्यापीठ म्हणून कार्यान्वित करणे बाबतचा अहवाल शासनाने मागविलेला आहे. तेंव्हा उस्मानाबाद जिल्ह्यासाठी स्वतंत्र विद्यापीठ देण्याच्या मागणीचा सकारात्मक अहवाल राज्य शासनाकडे सुपूर्द करावा अशी मागणी स्वतंत्र विद्यापीठ निर्माण संघर्ष समितीचे अध्यक्ष अॅड.संजय भोरे यांच्यासह समितीच्या शिष्ट मंडळाने डॉ. प्रकाश बच्छाव यांची भेट घेऊन केली. यावेळी त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन ही देण्यात आले.

यावेळी स्वतंत्र विद्यापीठ निर्माण संघर्ष समितीचे अध्यक्ष अॅड.संजय भोरे, उपाध्यक्ष विक्रम राऊत, सहसचिव अभिजित चव्हाण, अक्षय नाईकवाडी,अॅड.अजिंक्य देशमुख, व्यंकटेश कोळी, इंद्रजित कुलकर्णी आदींची उपस्थिती होती. 

 
Top